ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूंमध्ये एलिसा पेरीचा समावेश होतो. या अष्टपैलू महिला क्रिकेटपटूचा नुकताच घटस्फोट झाला आहे. तिने ऑस्ट्रेलियन रग्बी युनियनचा खेळाडू मॅट तोमुआसोबतचे आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. एलिसा आणि मॅट दोघांनीही सोशल मीडियाद्वारे या गोष्टीची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
परंतु, मजेची गोष्ट ही आहे की, एलिसा आणि मॅटच्या घटस्फोटनंतर भारतीय संघाचा क्रिकेटपटू मुरली विजय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. काही महिन्यांपुर्वी मुरलीने एलिसा ही जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू असल्याचे म्हटले होते. तसेच, त्याने एलिसासोबत डिनर डेटवर जाण्याची इच्छाही व्यक्त केली होती. यावर प्रत्युत्तर देत एलिसा म्हणाली होती की, ती मुरलीसोबत डिनर डेटवर जाण्यासाठी तयार आहे. परंतु, बिल मुरलीला द्यावे लागेल.
त्यामुळे जशी एलिसाची आपल्या पतीला घटस्फोट देण्याची बातमी समोर आली. तसे चाहत्यांनी मुरलीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही चाहत्यांनी तर असेही म्हटले की, “एलिसाच्या घटस्फोटमुळे मुरलीला खुप आनंद झाला असणार.”
मुरली विजय हा विवाहित आहे. त्याच्या पत्नीचे नाव निकिता आहे. तसेच त्यांना ३ मुलेही आहेत. निकिता ही सुरुवातीला भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची पत्नी होती. परंतु, मुरलीसोबत तिचे संबंध असल्यामुळे दिनेशने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१२ला निकिता आणि मुरलीने लग्न केले.
महत्त्वाच्या बातम्या –
पंड्याची पत्नी नताशाने शेअर केला फोटो; चाहते म्हणतात,…
१४३ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडला असा अनेखा…
५०० कसोटी विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडच्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
ट्रेंडिंग लेख –
एमएस धोनीमुळे भारतीय संघाला मिळाले हे ५ ‘मॅच विनर’….
भारताचे ३ दिग्गज खेळाडू ज्यांना कधीच मिळाला नाही अपेक्षित सन्मान…
४०० पेक्षा जास्त टी२० सामने खेळणारे ३ खेळाडू; तिघेही आहेत एकाच संघातील