---Advertisement---

आजच्याच दिवशी मुरलीधरनच्या फिरकीच्या तालावर नाचले होते झिम्बावेचे फलंदाज; थोडक्यात हुकला होता ‘हा’ विक्रम

On: सोमवार, जानेवारी 4, 2021 6:43 PM
---Advertisement---

श्रीलंकेचा माजी महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावे अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८०० बळींचा टप्पा गाठणारा तो एकमेव गोलंदाज आहे. असाच एक खास विक्रम १९ वर्षांपूर्वी मुरलीधरनने आपल्या नावे केला होता. ४ जानेवारी २००२ रोजी त्याने झिम्बावेविरुद्ध एका डावात अवघ्या ५१ डावात ९ बळी घेण्याचा कारनामा केला होता.

श्रीलंकेतील कँडी येथे झिम्बावे आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळविण्यात येत होता. यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना झिम्बावेचा डाव अवघ्या २३६ धावांवर आटोपला. यात मुरलीधरनने सर्वाधिक ९ बळी घेत झिम्बावेच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले होते. विशेष म्हणजे सामन्याच्या पहिल्या दिवशी पडलेले सगळे बळी मुरलीधरनच्या नावावर होते. मात्र चामिंडा वासने दुसऱ्या दिवशी झिम्बावेच्या अखेरच्या फलंदाजाला बाद केल्याने मुरलीधरन एका डावात १० बळी घेण्याच्या विक्रमापासून वंचित राहिला.

या सामन्यात दुसऱ्या डावातही मुरलीधरनने ६४ धावांत ४ बळी घेतले. त्यामुळे झिम्बावेचा दुसरा डावही १७५ धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेने पहिल्या डावात ५०५ धावांचा डोंगर उभा केल्याने त्यांनी या सामन्यात झिम्बावेवर एक डाव आणि ९४ धावांनी विजय मिळविला. सामनावीराचा पुरस्कार अर्थातच १३ बळी घेऊन या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मुरलीधरनला देण्यात आला.

मुरलीधरनची ही कामगिरी कसोटी सामन्यात एका डावात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत इंग्लडचे जिम लेकर यांची ५१ धावांत १० बळी ही कामगिरी अव्वल स्थानावर आहे. त्यांनी २६ जुलै १९५६ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा कारनामा केला होता. भारताचा अनिल कुंबळे यात दुसऱ्या स्थानी असून त्याने ४ फेब्रुवारी १९९९ पाकिस्तानविरुद्ध ७४ धावांत १० बळी घेतले होते. इंग्लंडचेच जॉर्ज लेहमन यात तिसऱ्या स्थानी असून त्यांनी २ मार्च १८९६ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८ धावांत ९ बळी घेण्याचा परक्रम केला होता. चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा जिम लेकर असून त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच २६ जुलै १९५६ रोजी ३७ धावांत ९ बळी घेतले होते.

महत्वाच्या बातम्या:

NZ vs PAK 2nd Test: विलियम्सन-निकोल्सची अभेद्य भागीदारी, दुसर्‍या दिवसअखेर न्यूझीलंड मजबूत स्थितीत

IND vs AUS : सिडनी कसोटीआधी खास आकडेवारी, पाहा कोणाचा राहिलाय दबदबा

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारतीय फलंदाजांचा दबदबा; शतक सोडा द्विशतकेही ठोकलीत याच मैदानावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---