---Advertisement---

भारतीय सलामीवीर मुरली विजयची ‘या’ मोठ्या स्पर्धेतून माघार, जाणून घ्या कारण

On: सोमवार, डिसेंबर 21, 2020 7:26 AM
---Advertisement---

कोरोना महामारीच्या प्रभावामुळे बंद असलेले भारतीय क्रिकेटजगत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सुरू होत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे भारतात देशांतर्गत स्पर्धांना सुरुवात होईल. त्यासाठी, जवळपास सर्वच राज्य क्रिकेट संघटनांनी आपापले संभावित संघ जाहीर केले आहेत. पण तमिळनाडू क्रिकेट संघाने जाहीर केलेल्या संभाव्य संघातून मुरली विजयने माघार घेतली आहे. विजय सोबतच वेगवान गोलंदाज के.विघ्नेश हा देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

१० जानेवारीपासून सुरु होणार आहे टी२० स्पर्धा

कोरोना महामारीमुळे लांबला गेलेला भारतीय देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने सुरु होईल. १० जानेवारी ते ३० जानेवारी या दरम्यान सहा वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा जैव प्रतिबंधक वातावरणात पार पडेल. दरवेळी रणजी ट्रॉफीने सुरु होणारा हंगाम यावेळी सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेने सुरु करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता.

मुरली विजयने घेतली माघार

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी तमिळनाडू क्रिकेट संघटनेने आपला २६ जणांचा संभावित संघ काही दिवसांपूर्वी घोषित केला होता. त्यातून, २१ डिसेंबर रोजी अंतिम संघ निवडला जाईल. तत्पूर्वी, अनुभवी सलामीवीर आणि भारताचे प्रतिनिधित्व केलेला मुरली विजय याने वैयक्तिक कारणास्तव संपूर्ण हंगामातून माघार घेतली आहे.

विजय सोबतच वेगवान गोलंदाज के.विघ्नेश हा देखील आगामी स्पर्धेसाठी तमिळनाडू संघाचा भाग असणार नाही. विघ्नेशची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, तो निवडीसाठी उपलब्ध नसेल.

मुरली विजय आणि के.विघ्नेश यांच्या अनुपस्थितीत तमिळनाडू क्रिकेट संघटनेने फलंदाज एल.सूर्यप्रकाश व मध्यमगती गोलंदाज जगन्नाथ सिनिवास यांचा तमिळनाडू संघात समावेश केला आहे.

तमिळनाडू संघात आहे अनुभवी खेळाडूंचा समावेश

मुरली विजय स्पर्धेतून बाहेर झाला असला तरी दिनेश कार्तिक, विजय शंकर,‌ संदीप वॉरीयर व एम. अश्विन हे अनुभवी खेळाडू तमिळनाडू संघाचा भाग आहेत. तमिळनाडूचा संघ १९,२० व २१ रोजी तीन सराव सामने खेळेल. तमिळनाडूचा समावेश या स्पर्धेसाठी आसाम, बंगाल, झारखंड, हैदराबाद आणि ओरिसा यांच्यासह एलिट ब गटात आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीच्या कोचला दिल्ली क्रिकेटमध्ये मिळाली ‘मोठी’ जबाबदारी

“महिला क्रिकेटविषयी बीसीसीआयमध्ये स्पष्टतेचा अभाव”; माजी महिला क्रिकेटपटूने मांडले परखड मत

नवी आयसीसी क्रमवारी जाहीर; मैदानापाठोपाठ इथेही भारतीयांच्या उडाल्या दांड्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---