---Advertisement---

मोठा भाऊ भारतासाठी खेळत असताना मुशीर खाननं द्विशतक! रणजीच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई सुस्थितीत

Musheer Khan
---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची रणजी ट्रॉफी सध्या खेळली जात आहे. स्पर्धाच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने सध्या खेळले जात आहेत. मुंबई आणि बडोदा संघात रजणी ट्रॉफी हंगामाचा दुसरा सामना शुक्रवारी (23 फेब्रुवारी) सुरू झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा करणाऱ्या मुंबईसाठी मुशीर खान याने झंजावाती खेळी करत कारकिर्दीतील पहिले रणजी द्विशतक ठोकले. दुसरीकडे मुशीरचा मोठा भाऊ सरफराज खान याने नुकतेच भारतासाठी कसोटी पदार्पण केले. 

नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षांखालील वनडे विश्वचषकात भारतीय संघ उपविजेता ठरला. मुशीर खान (Musheer Khan) याने या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. विश्वचषकात मुशीरच्या बॅटमधून एक अप्रतिम शतक देखील आले होते. आता आपला हाच फॉर्म मुशीर खान मुंबई रणजी संघासाठी कायम ठेवत आहे. रणजी ट्रॉफी 2024 च्या उपांत्यपूर्व सामन्यात बडोदा संघाविरुद्ध त्याने मुंबईकडून द्विशतक केले. या सामन्याच्या पहिल्या डावात मुशीर 357 चेंडूत 203* धावांची खेळी करू शकला. यात एकूण 18 चौकारांचा समावेश होता. भारतासाठी राजकोट कसोटी सामन्यातून पदार्पण करणाऱ्या सरफराज खान (Sarfaraz Khan) याने सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये द्विशतक केले.

बडोदा संघासाठी भार्गव भट्ट याने पहिल्या डावात सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तर निनाद रथवा यांने राहिलेल्या तीन खेळाडूंना तंबूत धाडले. महेश पिठिया, प्रियांशू मोलिया, लुकमान मेरीवाला आणि राज लिंबानी यांना एकही विकेट मिळाली नाही.

तत्पूर्वी पहिल्या डावात मुंबईसाठी मुशीर खान आणि हार्दिक तामोरे यांच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. मुशीरचे द्विशतक आणि तामोरोने 57 धावांची खेळी केली. पृथ्वी शॉ आणि भूपेन ललवानी या सलामीवीर फलंदाजांनी स्वस्तात विकेट गमावल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे (3 जून) यानेही अवघ्या 3 धावांवर विकेट गमावली. शम्स मुलानी 6, तर सुर्यांश शेडगे याने 20 धावांवर बाद झाला. तळातील तीन फलंदाजही एक आकडी धावसंख्येवर बाद झाले.

मुंबईने 142 धावांवर सुरुवातीच्या पाच विकेट्स गमावल्या होत्या. पणसहाव्या विकेटसाठी मुशीर खान आणि हार्दिक तमोरे यांच्यात 181 धावांची महत्वपूर्ण भागीदारी पार पडली. मुशीरच्या द्विशतकामुळेच मुंबई संघ सुस्थितीत पोहोचला.

महत्वाच्या बातम्या – 
IND Vs ENG : सरफराज खानने शोएब बशीरची उडवली खिल्ली म्हणाला, ‘त्याला हिंदी अजिबात…
IND vs ENG । ‘मलाच भीती वाटते…’, चाहतीच्या प्रश्नावर यशस्वी जयस्वालचे खास उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---