---Advertisement---

एवढी हिंमत! बांगलादेशी यष्टीरक्षकाकडून विराटला शिवीगाळ, पुढे जे घडले ते पाहाच…

On: शनिवार, डिसेंबर 24, 2022 8:12 PM
Virat Kohli gave strong reply
---Advertisement---

भारत आणि बांगलादेश या संघांमध्ये दुसरा कसोटी सामना मीरपूर येथे खेळवला जात आहे. तिसऱ्या दिवशी विजयासाठी 145 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची अवस्था खराब झाली आहे. भारताने अवघ्या 39 धावांवर आपले 4 गडी गमावले होते. या डावात अशी एक घटना घडली ज्यामुळे मैैदानात मोठा वाद बघायला मिळाला. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याला एका वरीष्ठ बांगलादेशी खेळाडूने डिवचले होते. ज्यावर कोहली राग व्यक्त करताना दिसला.

या डावात भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली 20व्या षटकात पाचव्या चेंडूवर शॉट लेगला मोमिन उल हक याच्या हातून झेलबाद झाला. मात्र, जेव्हा तो बाद झाल्यानंतर तंबूच्या दिशेने जात होता त्यावेळी बांगलादेशी संघ जेव्हा जल्लोष करण्यासाठी एकत्र आला तेव्हा मोठी वाद बघायला मिळाला. संघातील वरीष्ठ खेळाडू मुशफिकुर रहीम यानेे कोहलीला घाण शिवी दिली. जेव्हा कोहलीच्या कानावर ते शब्द पडले तेव्हा तो खेळांडूंच्या दिशेने चालू लागला. अशातच पंचांनी धाव घेतली आणि विराटला थांबवले. विराटने आपल विरोध पंचांकडे नोंदवला. मात्र आपल्या गरम स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या विराटने मैदानावरच सोक्ष-मोक्ष लावला. विराटने शिवीचे उत्तर शिवीने देत जश्यास तसे उत्तर दिले. यावेळी विराटचा राग त्याच्या डोळ्यात स्पष्ट झळकत होता.

https://twitter.com/AbdullahBDFan/status/1606607349648879617?s=20&t=FoNPDjUV0aiBEB_mNQHqhg

भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याने नाट्यमय वळण घेतले. दुसऱ्या डावात भारताला विजयासाठी 145 धावांची गरज होती. हे आव्हान सुरुवातीला सोपे वाटत होते. मात्र, नंतर बांगलादेशच्या फिरकीपटूंनी भारताला बॅकफुटवर आणले. भारतीची वरची फळी 39 धावांवरच कोलमडली. भारताने आपले पहिले चार गडी 39 धावांवर गमावले. आता भारताला चौथ्या दिवशी 100 धावांची गरज आहे आणि भारताचे महत्वाचे चार गडी बाद झालेले आहेत. आता भारताच्या फलंदाजीची जबाबदारी रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यावर आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धही थंडच राहिली राहुलची बॅट; दोन्ही सामन्यात ठरला फुल फ्लॉप
सीएसके आणि मुंबईच्या गोटात भीतीचे वातावरण! आगामी हंगामात संघचे प्रदर्शन सुधारणे गरजेचे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---