---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : उत्तर प्रदेशचा सलग तिसरा पराभव, सुरेश रैना पुन्हा अपयशी

On: गुरूवार, जानेवारी 14, 2021 10:57 PM
---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतील गुरुवारी ए गटातील सामना उत्तर प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर या संघात खेळला गेला.  जम्मू आणि काश्मीरच्या संघाने हा सामना 8 विकेट्सने जिंकला. त्यामुळे उत्तर प्रदेश संघाचा सलग तिसऱ्या सामन्यात पराभव झाला. या सामन्यात पुन्हा एकदा सुरेश रैना अपयशी ठरला. या सामन्यात सुरेश रैना आपले खाते सुद्धा उघडू शकला नाही. उत्तर प्रदेशच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 124 धावसंख्या उभारली होती. जम्मू आणि काश्मीरच्या संघाला विजयासाठी 125 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग  त्यांनी 15 षटकांत 2 गडी गमावून 126 धावा केल्या आणि हा सामना 8 गडी राखून जिंकला.

जम्मू आणि काश्मीरच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या संघाला आमंत्रित केले होते. उत्तर प्रदेश संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सलामी फलंदाज कर्ण शर्मा 1 धाव काढून बाद झाला. त्यामुळे त्यांची सुरुवात खराब झाली. कर्णधार प्रियम गर्ग याने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने 36 चेंडूचा सामना 2 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. तसेच शिवम चौबेने 33 चेंडूचा सामना करताना 28 धावा केल्या. त्याचबरोबर पुन्हा एकदा सुरेश रैना फ्लॉप ठरला, तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर इतर कोणताही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश संघ 20 षटकांत 5 बाद 124 धावसंख्या उभारू शकला. जम्मू आणि काश्मीरच्या संघाकडून मुज्ताब युसूफने गोलंदाजी करताना 4 षटकात 14 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. त्याचबरोबर आबिद मुश्ताक आणि अब्दुल समद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

जम्मू आणि काश्मीरने 125 धावांचा पाठलाग करताना हे लक्ष 15 षटकांत पूर्ण केले. त्यांनी 2 गडी गमावून 126 धावा केल्या. यामध्ये कामरान इकबालने सलामीला येत 16 चेंडूत 17 धावा केल्या. त्याचबरोबर सूर्यांश रैनाने 14 चेंडूचा सामना करताना 15 धावा काढल्या. त्यानंतर अब्दुल समदने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 35 चेंडूचा सामना करताना 4 षटकार आणि 2 चौकार खेचत 54 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याला साथ देताना शुभम खजूरीया याने चांगली खेळी केली. त्याने 25 चेंडूचा सामना करताना 3 चौकार आणि एक षटकार ठोकत नाबाद 35 धावांची खेळी साकारून जम्मू आणि काश्मीरच्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात जम्मू आणि काश्मीर संघाने 8 विकेट्सने उत्तर प्रदेशला पराभूत केले. उत्तर प्रदेशकडून मोहसीन खानने 4 षटके गोलंदाजी करताना 17 धावा देताना दोन गडी बाद केले.

महत्वाच्या बातम्या:

अजिंक्य रहाणेने ही कामगिरी केली तर शास्त्री गुरुजी पडणार तोंडघशी, कसं ते पाहाच!

हम है तय्यार! ब्रिस्बेन कसोटीसाठी भारतीय संघाचा कसून सराव; पाहा व्हिडिओ

अपना विहारी सब पर भारी, भाजपा खासदाराच्या त्या टीकेला विरूचे अनोख्या अंदाजात प्रत्युत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---