---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: विजयानंतरही मुंबई स्पर्धेबाहेर; या ४ संघांचा सेमिफायनलमध्ये प्रवेश

---Advertisement---

बुधवारी (27 नोव्हेंबर) सुरत (Surat) येथे मुंबई (Mumbai) आणि पंजाब (Punjab) संघात सय्यद मुश्ताक अली (Sayed Mushtaq Ali Trophy)  टी20 स्पर्धेतील सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने पंजाबवर 22 धावांनी विजय मिळविला. परंतू विजयानंतरही मुंबईचे या स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे.

उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईला मोठा विजय आवश्यक होता. परंतु 3 बाद 243 धावा करूनही त्यांचा संघ पंजाबला कमी धावांवर रोखू शकला नाही. पंजाबने 6 बाद 221 धावा केल्या.

मुंबईकडून खेळताना पृथ्वी शाॅने (Prithvi Shaw) 27 चेंडूत 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर, श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 40 चेंडूत 80 धावा केल्या. तसेच, कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 35 चेंडूत 80 धावा केल्या.

पंजाबकडून गोलंदाजी करताना हरप्रीत ब्रारने (Harpeet Brar) सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर, सिद्धार्थ कौलने (Siddarth Kaul) 1 विकेट घेतली.

पंजाबकडून खेळताना शुबमन गिलने (Shubman Gill) 38 चेंडूत सर्वाधिक 78 धावा केल्या. तर, अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) 29 चेंडूत 47 धावा केल्या. तसेच, गुरकीरत सिंगने (Gurkeerat Singh) 21 चेंडूत 40 धावा केल्या.

मुंबईकडून गाेलंदाजी करताना शार्दूल ठाकूर (Shardul Thakur), तुषार देशपांडे (Tushar Deshpande) आणि शुभम रांजणेने (Shubham Ranjane) प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

मुंबईचा संघ हा सामना जिंकला. परंतु,  त्यांच्या गुणतालिकेतील कमी नेट रनरेटमुळे ते या स्पर्धेतून बाहेर पडले.

सुपर लीग ग्रुप बी मधील तामिळनाडू (Tamilnadu), कर्नाटक (Karnataka) आणि मुंबई (Mumbai) या संघांनी प्रत्येकी 12 गुण मिळवले होते. परंतु, पहिल्या दोन संघांनी चांगल्या नेटरनरेटच्या आधारे अंतिम चार संघामध्ये स्थान मिळवले.

आता 29 नोव्हेंबरला उपांत्य फेरीच्या सामन्यात तामिळनाडूचा सामना सुपर लीग गट ए मध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या राजस्थानबरोबर होईल. तर कर्नाटकचा सामना सुपर लीग गट ए मध्ये अव्वल क्रमांकावर असणाऱ्या हरियाणाशी होईल.

27 नोव्हेंबरला सुपर लीग फेरीत तामिळनाडूने झारखंडचा 8 गडी राखून पराभव केला, तर हरियाणाला रोमांचक सामन्यात महाराष्ट्रने दोन धावांनी पराभूत केले. पण हरियाणाने आधीच त्यांच्या गटात अव्वल स्थान मिळवले असल्याने त्यांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले होते. तसेच राजस्थाननेही दिल्लीवर दोन धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

हरियाणा (Haryana) सुपर लीग गट ए मध्ये 12 गुणांसह अव्वल क्रमांक राहिला, तर या गटातील राजस्थान, महाराष्ट्र व बडोदाचे (Baroda) प्रत्येकी 8 गुण होते. परंतु चांगल्या नेट रनरेटच्या आधारे राजस्थानने महाराष्ट्र आणि बडोद्याला मागे टाकत अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळविले.

https://twitter.com/Maha_Sports/status/1200003743414013952

https://twitter.com/Maha_Sports/status/1199971570598309891

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---