माजी महान गोलंदाज आणि सनरायझर्स हैद्राबाद संघाचा विद्यमान गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरनला चेन्नईत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मुरलीधरनला अचानक त्रास झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. मात्र आता एक चांगली बातमी समोर येत आहे.
त्याला लवकरच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. अपोलो हॉस्पिटलने आज जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी ही चिंता दूर करणारी बातमी ठरली आहे.
चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलने आजच हे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. यात “श्रीलंकेचा माजी खेळाडू मुथय्या मुरलीधरनला हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी अपोलो हॉस्पिटल मध्ये १८ तारखेला भरती करण्यात आले होते. त्याच्यावर रविवारी यशस्वीपणे अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. सोमवारी म्हणजे आज त्याला डिस्चार्ज देण्यात येईल आणि तो आपले नॉर्मल रुटीन सुरु करेल”, असे म्हंटले आहे. त्यामुळे आता लवकरच मुरलीधरन मैदानावर परतलेला दिसेल, अशी चाहत्यांना आशा आहे.
मुरलीधरनने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या एक दिवसापूर्वीच शनिवारी (१७ एप्रिल) आपला ४९ वा वाढदिवस साजरा केला होता. आयपीएलसाठी येण्यापूर्वी श्रीलंकेमध्ये त्याच्या हृदयात असलेल्या ब्लॉकेजबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्याला आधी सांगण्यात आले होते की स्टेंट टाकण्याची कोणतीही अवश्यकता नाही. पण चेन्नईमधील ओपोलो हॉस्पिटलमध्ये त्याला अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे त्याने त्वरित हॉस्पिटल मध्ये दाखल होत उपचार घ्नेयचा निर्णय घेतला होता, अशी माहिती सनरायझर्स हैदराबाद संघाचे सीइओ शान्मुगनाथन यांनी दिली होती.
मुरलीधरनने कसोटीत एकूण १३३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २२.७२ च्या सरासरीने एकूण ८०० विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ३५० वनडे सामने खेळताना एकूण ५३४ विकेट्स घेतल्या आहेत. हा एक विक्रम आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हैद्राबादच्या अपयशाचे लक्ष्मणने सांगितले कारण, ‘यांना’ धरले जबाबदार
पदार्पणाच्या सामन्यात हॅट्रिकसह ९ बळी घेत ‘या’ गोलंदाजाने घडविला इतिहास
CSK vs RR : चेन्नईला तिसरा धक्का, मोईन अली २६ धावांवर बाद; १० षटकांत चेन्नईच्या ३ बाद ८२ धावा