---Advertisement---

आरसीबी संघात सामील झाल्याने ग्लेन मॅक्सवेलचे ‘हे’ मोठे स्वप्न होणार पूर्ण

On: गुरूवार, एप्रिल 8, 2021 11:47 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्सचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या कामगिरीवर अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. यावर्षीच्या लिलावामध्ये आरसीबीने त्याला 14.25 कोटी रुपयांत विकत घेतले आहे. मागील आयपीएल हंगाम त्याच्यासाठी खूप खराब गेला होता. तो खेळत असलेल्या पंजाब किंग्ज संघाकडून त्याला एकही षटकार मारता आला नव्हता, त्यामुळे पंजाब संघाने त्याला या आयपीएल हंगामापूर्वी संघातून बाहेर सोडले.

त्यानंतर आयपीएल 2021 च्या लिलावामध्ये आरसीबीने त्याला संघात समाविष्ट केले. या संघात सहभागी झाल्यानंतर मॅक्सवेलने सांगितले की, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स समवेत एकाच संघात खेळण्याचे त्याचे जुने स्वप्न होते, ते आता पूर्ण होईल.

त्याशिवाय मॅक्सवेलने असे म्हटले आहे की, बायो बबल राहणे म्हणजे एखाद्या वाईट स्वप्नासारखे असून क्रिकेटर्स सध्या अतिशय कठीण अशी जीवनशैली जगत आहेत. मानसिक आरोग्यामुळे त्याने काही महिन्यांपूर्वी क्रिकेटपासून काही काळ विश्रांतीही घेतली होती. कोविड -19 दरम्यान जगत असलेल्या जीवनशैलीचा जगभरातील खेळाडूंवर निश्चितच परिणाम झाल्याचे त्याने कबूल केले आहे.

त्याच्या मते ‘बायो बबलमध्ये रहाणे खूप कठिण आहे. बायो बबलमध्ये बाहेरून येणाऱ्या माणसांना ठेवले जाते. त्यामध्ये तुम्ही कधीही न संपणाऱ्या वाईट स्वप्नामध्ये अडकून राहता. जिथे तुम्हाला दररोज एकच जीवन जगयला मिळते.’

तसेच तो म्हणाला की, ‘बाहेरील जगाशी सामान्य चर्चा कशी केली जाते हे आपण जवळजवळ विसरून जातो. मानसिकदृष्ट्या हे एक खूप मोठे आव्हान आहे. पुन्हा खेळताना आणि लोकांचे मनोरंजन करतानी खूप आनंदही वाटत आहे. परंतु, ही जीवन जगण्याची पद्धत खूपच वाईट आहे.’

आरसीबी संघात सामील होण्याबद्दल तो म्हटला की, “कोहली आणि डिव्हिलियर्सबरोबर खेळणे हे एक माझे जुने स्वप्न होते. मैदानाबाहेर मी त्यांना खूप चांगले ओळखत आहे, परंतु या अगोदर मी त्यांच्याविरुद्ध खेळलो आहे. पण आता मला त्याच्याबरोबर एकाच संघात खेळण्याची संधी मिळली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२१: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची साथ सोडणार? पाहा विराट कोहलीने काय दिले उत्तर

चेन्नईने ज्या खेळाडूला संघाबाहेर केले, ‘तो’ मुंबई इंडियन्सला मिळवून देऊ शकतो ६ वे विजेतेपद, रोहित शर्माला विश्वास

कमाल! ब्रेंडन मॅक्यूलमने टेनिस रॅकेटने मारलेल्या चेंडूवर ४० वर्षीय हरभजन सिंगने घेतला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---