भारतीय वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने आयपीएल 2021 मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन होते. त्यामुळे आता त्याची श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. चेतन सकारिया याची याच दौऱ्यासाठी भारताच्या एकदिवसीय आणि टी20 संघामध्ये निवड झाली आहे. आता निवड झाल्यानंतर त्याने प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
व्यक्त केली ‘ही’ खंत
भारतीय संघामध्ये निवड झाल्याची बातमी कळल्यानंतर चेतन सकारिया भावुक झाला. यावेळी त्याला त्याच्या वडिलांची आठवण आली. मागील महिन्यात त्याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. चेतन सकारिया म्हणाला की, “खरंच आजचा हा दिवस बघायला माझे वडील जिवंत असायला पाहिजे होते. त्यांची खूप इच्छा होती की मी भारतासाठी खेळावं. मला त्यांची खूप आठवण येत आहे. देवाने मला एका वर्षात खूप चढ-उतार दाखवले.”
चेतन सकारियाने त्याच्या छोट्या भावालाही गमावले आहे. तो म्हणाला, “मी माझ्या भावाला गमावले आणि एका महिन्यानंतर मला आयपीएल खेळायची संधी मिळाली. मी मागच्या महिन्यातच माझ्या वडिलांना गमावले आहे. आणि देवाने मला भारतीय संघामध्ये निवड झाल्याची बातमी ही ऐकवली. मी माझ्या वडिलांचा जीवन मरणाचा संघर्ष जवळून पाहिला आहे. माझ्या आई वडिलांनी क्रिकेट खेळत राहण्याचा परवानगी दिली, म्हणून आज मी इथवर आलो आहे.”
आयपीएल मधील कामगिरी
चेतन सकारीयाने आयपीएल 2021 मध्ये 7 बळी घेतले. यादरम्यान चेतन सकारियाने एमएस धोनी, सुरेश रैना, केएल राहुल, नितीश राणा अशा उत्कृष्ट फलंदाजांचा बळी घेतला. चेतन सकारियासाठी महेंद्रसिंग धोनीला बाद करण्याचा क्षण सर्वात अविस्मरणीय आहे.
चेतन सकारियाची कारकीर्द
चेतन सकारियाने 22 फेब्रुवारी 2018 रोजी 2017-18 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. 20 नोव्हेंबर 2018 रोजी त्याने आपला हा पहिला सामना खेळला. पहिल्या डावात त्याने पाच बळी घेतले. 21 फेब्रुवारी 2019 रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 2018-19ला सौराष्ट्रकडून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2021च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये सकारियाला राजस्थान रॉयल्सने लिलावात 1.2 कोटीमध्ये विकत घेतले.
महत्त्वाच्या बातम्या:
झिरोच झिरो! कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल इतक्या वेळा शून्यावर बाद झाला हा दिग्गज
श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधारपदी नियुक्त झाल्यावर शिखर धवनने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला…