---Advertisement---

मयंक अगरवाल म्हणतो, ही द्विशतकी खेळी खास!

On: बुधवार, जानेवारी 1, 2020 5:26 PM
---Advertisement---

भारताचा कसोटी सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने (Mayank Agarwal) भारतीय संघात येण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावर कसोटीत पदार्पण केले.

मयंकने 26 डिसेंबर 2018ला मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) कसोटी सामन्यात पदार्पण केले.  आतापर्यंत त्याने 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 2 द्विशतक (Double Century) केले आहे. त्याचबरोबर, त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतके त्याच्या नावावर आहेत.

त्याने विशाखापट्टणमला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात पहिले द्विशतक केले होते. त्यावेळी त्याने 215 धावांची खेळी केली होती. तर दुसरे द्विशतक त्याने बांगलादेश विरुद्ध इंदोरला झालेल्या कसोटीत केले होते. त्यावेळी त्याने 243 धावांची खेळी केली होती.

मयंकने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीतकसोटीतील सर्वात आवडती द्विशतकी खेळीबद्दल खूलासा केला आहे. तो म्हणाला, “खरं सांगायचं झालं तर मी तो व्यक्ती नाही जो तुलना करेल. दोन्हीही खेळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा मी पहिले द्विशतक केले. ते स्वाभाविकपणे उत्कृष्ट असेल.”

“यानंतर पुढच्या मालिकेतही द्विशतकी खेळी करणे हेही उत्कृष्टच आहे. माझ्यासाठी हेच महत्त्वाचे आहे की, मी जेव्हा स्थिर होतो तेव्हा मी मोठी खेळी करतो. तसेच, संघाच्या विजयात योगदान देतो,” असेही मयंक म्हणाला.

मयंकने त्याच्या कारकिर्दीत 9 कसोटी सामन्यात 67.07 च्या सरासरीने 872 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 2019मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मयंक हा सहावा खेळाडू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---