---Advertisement---

‘मरण्याआधी माझी इच्छा…’, धोनीकडून ऑटोग्राफ मिळाल्यानंतर काय म्हणाले गावसकर?

Sunil Gavaskar
---Advertisement---

सुनिल गावसकर जगातील सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेपटूंपैकी एक आहेत. रविवारी (14 मे) गावसकरांनी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यानंतर सर्वांचे लक्ष वेधले. आपले होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर एमएस धोनीसाठी हा सामना शेवटचा ठरू शकतो याची कल्पना सर्वांनाच होती. गावसकर देखील त्यापैकीच एक म्हणता येतील. सामना संपल्यानंतर गावसकरांनी आपल्या शर्टवर धोनीची स्वाक्षरी घेतली. याच पार्श्वभूमीवर गावसकरांची नवीन प्रतिक्रिया समोर येत आहे.

रविवारी सीएसके आणि केकेआरचा सामना संपल्यानंतर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी जे केले, त्याविषयी जागतिक क्रिकेटमध्ये चर्चा आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर एमएस धोनी (MS Dhoni) याचा हा शेवटचा सामना ठरू शकतो. कारण सीएसकेला चालू आयपीएल हंगामात लीग स्टेजमधील अजून एकच सामना खेळायचा आहे, जो दिल्लीमध्ये होईल. प्लेऑफच्या चार संघात सीएसकेने स्थान बनवले, तर मात्र याठिकाणी अजून एक सामना सीएसके खेळेल. पण सीएसके प्लेऑफमध्ये पोहोचेलच अशी कुठलीच खात्री देता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर धोनी आणि संघ सहकाऱ्यांनी केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर स्टेडियमवर गोल फिरून चाहत्यांच्या दिशने सीएसकेच्या जर्सी वाटल्या. याचदरम्यान, गावसकर धोनीजवळ आले आणि आपल्या शर्टवर त्याची स्वाक्षरी घेतली. येत्या काही दिवसांमध्ये धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेतली, तर गावसकरांसोबतचा हा क्षण नेहमीच लक्षात राहण्यासारखा ठरेल.

https://twitter.com/StarSportsIndia/status/1658369459416109058?s=20

एका माध्यमावर गावसकर म्हणाले की, “हा माझ्यासाठी भावनिक क्षण होता. त्याने (धोनी) संघासाठी खूपकाही केले आहे. मला जर माहीत असेल की हे माझ्या आयुष्यातील शेवटचे क्षण आहेत, तर दोन मिनिटांसाठी दोन क्षण पुन्हा जगून घेईल. यातील पहिला क्षण तो आहे, जेव्हा कपिल देव यांना 1983मध्ये विश्वचषक उचलून घेतला, तर दुसरा क्षण धोनीने तो षटकार मारून आपली बॅट फिरवल्याचा आहे. हे प्रसंग मी माझ्या शेवटाआधी पाहू इच्छितो.” गावसकर हे सर्व बोलत अशताना हरभजन सिंग आणि युसूफ पठाणही उपस्थित होते. गावसकरांचे बोलणे ऐकून हे दोघेही भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. (‘My wish before I die…’, what Gavaskar said after receiving MS Dhoni’s autograph?)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिलने शतक ठोकताच विराटची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘पुढे जा आणि नव्या पिढीचे…’
गिल-यशस्वीच्या खेळाने प्रभावित झाला ऑसी दिग्गज, म्हणाला, “हे भारताचे भविष्य…”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---