---Advertisement---

स्वत:साठी नाही, तर संघासाठी! धावा कुटण्याच्या नादात विक्रम मोडलाय हेच विसरून गेलेला जगदीशन, म्हणाला…

N-Jagadeesan
---Advertisement---

क्रिकेटविश्वात सध्या एका खेळाडूची तुफान चर्चा रंगली आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडूकडून खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीशन आहे. जगदीशनसाठी सोमवारचा (दि. 21 नोव्हेंबर) दिवस खूपच खास ठरला. त्याने आपल्या विस्फोटक फलंदाजीने मोठमोठे विक्रम मोडीत काढले. जगदीशनने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या अ दर्जाच्या इतिहासातील सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारली. त्याने तब्बल 277 धावांची वादळी खेळी खेळली. यापूर्वी हा विक्रम ऍलिस्टर ब्राऊन याच्या नावावर होता, ज्याने 2002मध्ये 268 धावा कुटल्या होत्या. ही अ दर्जाच्या क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी होती.

एन जगदीशन (N Jagadeesan) याने त्याच्या डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत आपला इरादा स्पष्ट केला. त्याने पहिले शतक आणि नंतर द्विशतकही झळकावले. त्याने 277 धावा करण्यासाठी 141 चेंडूंचा सामना केला. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 15 षटकार आणि 25 चौकारही निघाले. त्याच्या धावांच्या जोरावर तमिळनाडू संघानेही विक्रमी धावसंख्या उभारली. त्यांनी 50 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावत 502 धावा चोपल्या. विशेष म्हणजे, अरुणाचल प्रदेश संघाचा डाव फक्त 71 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे हा सामना तमिळनाडूने 435 धावांच्या अंतराने जिंकला.

https://twitter.com/BCCIdomestic/status/1594623837920190464

काय म्हणाला जगदीशन?
सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना एन जगदीशन म्हणाला की, “मला माहितीच नव्हते की, मी विक्रम मोडला आहे. मी बाद होऊन बाहेर आल्यानंतर समजले. मात्र, जसे मी म्हणालो, मी माझ्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत होतो. मी शतक बनवतो की, द्विशतक, याने काहीच फरक पडत नाही. मी फक्त धावा बनवण्याच्या प्रक्रियेचे पालन करत राहिलो.”

सलग पाच शतके ठोकणारा पहिला फलंदाज
या सामन्यात द्विशतक झळकावताच एन जगदीशन याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तो अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज आहे. तो अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सलग 5 शतके झळकावणारा एकमेव फलंदाज बनला. त्याने गोवाविरुद्ध 168 धावा, छत्तीसगडविरुद्ध 107, आंध्र प्रदेशविरुद्ध 114, हरियाणाविरुद्ध 128 आणि अरुणाचल प्रदेशविरुद्ध द्विशतक झळकावले. त्याने हे सर्व शतके एका आठवड्याच्या आत ठोकली आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतची जागा घेण्यासाठी सज्ज झाला ‘हा’ यष्टीरक्षक, सलग 5 शतकांचा पाऊस पाडत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
नव्या रंगात नव्या ढंगात होणार पुढील टी20 विश्वचषक! बदलणार सारी गणिते

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---