---Advertisement---

ख्रिस मॉरिसचा अचूक थ्रो आणि चेन्नईचा ‘तो’ फलंदाज सरळ तंबूत, पाहा

On: रविवार, ऑक्टोबर 11, 2020 11:01 AM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात शनिवारी (१० ऑक्टोबर) आयपीएल २०२०चा २५वा सामना झाला. या सामन्यात बेंगलोरने ३७ धावांनी विजय मिळवला. दरम्यान चेन्नईचा यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीशन धावबाद झाला.

बेंगलोरने नाणेफेक जिंकत सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात ४ बाद १६९ धावा केल्या. बेंगलोरच्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी पहिल्या ६ षटकांच्या आतच फाफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसनच्या महत्त्वपूर्ण विकेट्स गमावल्या. पुढे अंबाती रायडू आणि आयपीएल २०२०चा पहिला सामना खेळत असलेल्या एन जगदिशनने चेन्नईचा डाव सांभाळला.

चौदाव्या षटकापर्यंत त्यांनी चेन्नईचा स्कोर २ बाद ८९ धावांवर आणला. त्यानंतर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली डावातील १५वे षटक टाकण्यासाठी नवदिप सैनीला पाठवले. सैनीच्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेला जगदीशन धाव घेऊ शकला नाही. सैनीने दूसरा फुल टॉस चेंडू टाकला आणि त्यावर जगदीशनने मिड ऑफ बाजूला साधारण शॉट मारला. तरीही तो एक धाव घेण्यासाठी धावला.

https://twitter.com/SivaDhoniJnv/status/1314977608883347457?s=20

तेवढ्यात मिड ऑफ बाजूला उभा असेलल्या क्रिस मॉरिसने चेंडू पकडला आणि नॉन स्ट्राईकर बाजूच्या यष्टीवर अचूक चेंडू फेकला. त्यामुळे जगदीशन २८ चेंडूत ३३ धावा करत धावबाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

तुम तो छा गये भैया! युवराजच्या बॅटने आतापर्यंत २२० धावा कुटणारा ‘तो’ बनणार केकेआरचा कॅप्टन?

धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी देण्याऱ्या पोस्टवर भडकला पठाण; दिली तीव्र प्रतिक्रिया

पंजाब संघामागची साडेसाती संपेना! ८.५ कोटींना टीममध्ये घेतलेल्या खेळाडूला झाली दुखापत

ट्रेंडिंग लेख-

आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ

आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित

फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---