इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंवर या लिलावात मोठी रक्कम मिळाली. विजय हजारे ट्रॉफी गाजवणारा तमिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीसन याला यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात सामील करून घेतले.
https://twitter.com/KKRiders/status/1606260666276249600?t=-4gbSLO6nM81ls3CXLc8WQ&s=19
एन जगदीसन हा देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवी फलंदाज मानला जातो. मागील तीन वर्षापासून तो आपल्या राज्यातीलच फ्रॅंचायजी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा सदस्य होता. मात्र, संघात एमएस धोनीचा समावेश असल्याने त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. आयपीएल 2023 साठी चेन्नईने त्याला आपल्या संघात कायम केले नाही.
रिलीज केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच सुरू झालेल्या विजय हजारे ट्रॉफी या वनडे स्पर्धेत जगदीसन याने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. या स्पर्धेत त्याने आठ सामने खेळताना तब्बल 138 च्या सरासरीने 830 धावा कुटल्या. यामध्ये सलग पाच शतकांचा समावेश होता. हा विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील विक्रम आहे. यामध्ये त्याने 277 धावांची एक विश्वविक्रमी खेळी देखील केली होती.
त्याच्या याच कामगिरीनंतर आयपीएल लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्याला 90 लाखांवर समाधान मानावे लागले. चेन्नईनेच त्याच्यावरील बोलीची सुरुवात केली. मात्र, त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने 90 लाखांची अंतिम बोली त्याच्यावर लावली. कोलकाता संघात तो एकमेव भारतीय यष्टीरक्षक असल्याने त्याला पुढील संपूर्ण हंगामात संधी मिळण्याची शक्यता आहे.
(N Jagdeesan Got 90 Lakhs In IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या 40 लाखांच्या शिवम मावीला गुजरातने बनवले ‘एवढ्या’ कोटींचा मालक, तरीही गडी तोट्यातच
आयपीएल 2023च्या मिनी लिलावात ‘हे’ चार खेळाडू मालामाल, मिळाली 15 कोटींहून अधिक रक्कम






