अजय तांबट मित्र परिवारातर्फे सणस मैदानावर आयोजित केलेल्या नामदार राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेत महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघ आणि सुवर्णयुग संघाने आज शुक्रवारी झालेल्या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत एकतर्फी विजय मिळवले . पुरुष गटात मात्र पुण्याच्या सतेज संघ व महाराष्ट्र संघाला पराभव स्वीकारावा लागला .
महिलांच्या अ गटात राजमाता जिजाऊ संघाने पालघर येथील कुर्लाई क्रीडा संघाचा ४९ — ३२ असा पराभव केला . मानसी सावंत आणि स्नेहल शिंदे यांनी राजमाता जिजाऊ संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला . दोघीनी आज आपल्या खेळाचे चांगले दर्शन घडवत चान्गल्या चढाई केल्या.. तर कुर्लाई संघाच्या फरहान शेख हिने उत्कृष्ट खेळ केला.
ब गटात सुवर्णयुग मंडळ , पुणे या संघाने मातृभूमी संघ, पुणे यांचा ५०-१८ असा पराभव केला . ऐश्वर्या काळे हिने सुवर्णयुगसाठी उत्कृष्ट खेळ केला . तर श्रीजना योगी हिने मातृभूमी संघाकडून चांगली कामगिरी केली .
पुरुष गटात ब गटात ओम क्रीडा मंडळ, ठाणे यांनी महाराष्ट्र क्रीडा मंडळ, पुणे ४९-२४ अशी मात केली . ओम क्रीडा मंडळाकडून अभिजित पाटील आणि प्रशांत जाधव यांनी उत्कृष्ट चढाई व पकडी केल्या तर महाराष्ट्र मंडळाकडून अमरजित चव्हाण आणि अमोल सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला .
ब गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात कोल्हापूर येथील शाहूपूर सडोली संघाने पुण्याच्या बलाढ्य सतेज संघाचा २४-१७ असा पराभव केला . शाहुपूर सडोली संघाकडून अक्षय पाटील व अमित पाटील यांनी चांगला खेळ केला . तर , आत्माराम कदम आणि निलेश काळभरे यांनी चांगला खेळ करीत खेळात चुरस निर्माण केली . परंतु ते संघाचा पराभव टाळू शकले नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–असा पराक्रम करणारा कोहली ठरला केवळ चौथा भारतीय
–भारताच्या या बॅडमिंटनपटूचे मतदार यादीतून नाव झाले गायब
–होय! कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात गंभीरची चमकदार कामगिरी
–किंग कोहलीचा आॅस्ट्रेलियामध्ये विराट विक्रम