fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आयटीएफ अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात कसीदीत समरेज व मुलींच्या गटात सालसा अहेरला विजेतेपद

पुणे । डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणिपुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरिन एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात भारताच्या सालसा अहेर याने, तर मुलांच्या गटात थायलंडच्या कसीदीत समरेज या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या अंतिम फेरीच्या लढतीत मुलींच्या गटात सहाव्या मानांकित भारताच्या सालसा अहेरने आपली विजयी मालिका कायम ठेवत पाचव्या मानांकित थायलंडच्या पिमरादा जट्टावापोर्नवीतचा 6-2, 6-2असा सहज पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळवले. 1तास 33मिनिटे चाललेल्या या सामन्यात सालसाने पिमरादावर निर्विवाद वर्चस्व राखले. पहिल्या सेटमध्ये सालसाने पिमरादाची पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-2असा जिंकून आघाडी घेतली.

पिछाडीवर असलेल्या पिमरादाला शेवटपर्यंत सूर गवसला नाही. या सेटमध्ये सालसाने पिमरादाची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली. त्यानंतर सालसाने चतुराईने खेळ करत सातव्या गेममध्ये पिमरादाची पुन्हा एकदा सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. एमएसएलटीए व्हिजन कार्यक्रमाची सदस्य व लक्ष्य यांचा पाठिंबा असलेली सालसा ही सिम्बायोसिस कॉलेजमध्ये कला शाखेत शिकत असून आदर पुनावाला महाराष्ट्र टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. सालसाने या विजेतेपदाबरोबरच कुमार गटाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल 200खेळाडूंमध्ये स्थान प्राप्त केले असून ऑस्ट्रेलियन ओपन कुमार स्पर्धेच्या पात्रता फेरीत देखील प्रवेश मिळवला आहे.

मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात थायलंडच्या चौथ्या मानांकित कसीदीत समरेज याने जपानच्या सातव्या मानांकित रयुही अझूमा याचा 4-6, 6-2, 6-4असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. हा सामना 2तास चालला. कसीदीत हा पिरामिड टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक वित्तया समरेज यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना एम.व्ही.देव करंडक व 100 गुण, उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 60 गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण कर्नल खेर, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि गद्रे मरिन्स्‌ एक्स्पोर्टचे विभागीय वितरण व्यवस्थापक आश्विनकुमार जंगम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे मानद सचिव विश्वास लोकरे, स्पर्धेचे संचालक आणि डेक्कन जिमखानाचे टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी): मुले:
कसीदीत समरेज(थायलंड)(4)वि.वि.रयुही अझूमा(जपान)(7)4-6, 6-2, 6-4;
मुली: सालसा अहेर(भारत)(6)वि.वि.पिमरादा जट्टावापोर्नवीत(थायलंड)(5)6-2, 6-2.

महत्त्वाच्या बातम्या:

असा पराक्रम करणारा कोहली ठरला केवळ चौथा भारतीय

भारताच्या या बॅडमिंटनपटूचे मतदार यादीतून नाव झाले गायब

होय! कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात गंभीरची चमकदार कामगिरी

किंग कोहलीचा आॅस्ट्रेलियामध्ये विराट विक्रम

You might also like