नामीबिया राष्ट्रीय क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू डेविड विसेने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीविषयी त्याची भूमिका मांडली आहे. डेविड यापूर्वी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळलेला आहे आणि विराटसोबत त्याचे चांगले संबंध आहेत. डेविड विराटला चांगल्या प्रकारे ओळखतो. विराट जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे आणि तो त्याच्या खेळात अजून सुधारणा करू इच्छित आहे, असे डेविडने सांगितले आहे.
डेविडच्या मते विराट नेहमी त्याच्या खेळात सुधार करत असतो. तो म्हटला की, “विराट कोहली जगात सर्वोत्कृष्ट बनू इच्छित आहे आणि तो तोपर्यंत थांबणार नाही, जोपर्यंत तो सर्वोत्कृष्ट बनत नाही. माझ्या हिशोबाने हा त्याचा सर्वात मोठा गुण आहे. तो जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे आणि तरीदेखील स्वत:मध्ये सुधारणा करू इच्छित आहे. तो एक महान खेळाडू बनला आहे. पण त्याच्यासाठी एवढे पुरेसे नाही. तो अजूनही चांगला खेळाडू बनू इच्छित आहे. खेळाविषयी त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे. सरावादरम्यान तो अनेक तास घालवतो आणि अनेक गोष्टींवर काम करतो. तो नेहमी सुधार करण्याचा प्रयत्न करतो.”
डेविड २ देशासांठी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा दहावा खेळाडू
आगामी टी२० विश्वचषकात डेविड नामीबिया क्रिकेट संघासाठी खेळताना दिसणार आहे. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील तो १० वा खेळाडू बनेल, ज्याने दोन देशांसाठी टी२० सामने खेळले आहेत. डेविड यापूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी खेळला आहे. तसेच त्याने यूएई टी२० बॅशमध्ये नामीबिया संघासाठी यूएई संघाविरुद्ध टी२० सामनाही खेळला आहे. डेविड विसेच्या आधी ९ खेळाडू आहेत, ज्यांनी दोन देशांसाठी टी२० क्रिकेट प्रकारातील सामने खेळले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! आयपीएलमध्ये संधी देण्याच्या नावावर युवा खेळाडूंना लाखोंचा गंडा, मोठमोठी नावे यादीत






