आजची तिसरी लढत नांदेड चांबल चॅलेंजर्स विरुद्ध नंदुरबार हिमालयन ताहर्स अशी लढत झाली. दोन्ही संघ एकमेकांनाचे मागील २-३ वर्षांपासून टक्कर प्रतिस्पर्धी आहेत. नंदुरबार संघाने आक्रमक सुरुवात करत पहिल्या 4 मिनिटातच नांदेड संघावर लोन पडत 9-1 अशी आघाडी मिळवली. तेजस कालभोरच्या चतुरस्त्र चढाया समोर नांदेड संघाची बचावफळी संघर्ष करत होती.
नांदेडच्या अक्षय सूर्यवंशी व अजित चव्हाण यांनी आक्रमकता दाखवत पुढील काही मिनिटात नंदुरबार संघावर लोन पाडत सामना 14-14 असा बरोबरीत आणला. त्यानंतर अक्षय सूर्यवंशीने सुपर टेन पूर्ण करत संघाला मध्यंतरा पर्यत 22-19 अशी आघाडी मिळवून दिली. दोन्ही संघाचे चढाईपटू चांगला खेळ करत होते तर बचावपटूचा खेळ समाधानकारक होत नव्हता.
मध्यंतरा नंतर तेजस काळभोर सुपर टेन करत तर अतुल राठोड याने चांगल्या पकडी करत संघाची पिझाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. काटे की टक्कर झालेल्या लढतीत अखेर नांदेड संघाने 36-34 असा विजय मिळवला. नांदेड संघाकडून अक्षय सूर्यवंशी ने सर्वाधिक 13 गुण मिळवले तर अजित चव्हाण ने 8 गुण मिळवत चांगली साथ दिली. नंदुरबार संघाकडून ओमकार गाडे ने अष्टपैलू खेळ केला तर तेजस काळभोर चांगला खेळ करत सुपर टेन पूर्ण केला.
बेस्ट रेडर- अक्षय सूर्यवंशी, नांदेड चांबल चॅलेंजर्स
बेस्ट डिफेंडर्स- प्रणय चांदेरे, नांदेड चांबल चॅलेंजर्स
कबड्डी का कमाल- अक्षय सूर्यवंशी, नांदेड चांबल चॅलेंजर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण बनणार भारताचा पुढचा कर्णधार? सॅमसनचे नाव घेत एबी डिविलियर्सची मोठी भविष्यवाणी
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाचा सलग दुसरा विजय