---Advertisement---

चेन्नईने रिलीज केलेल्या खेळाडूने लावली शतकांची रांग, केली किंग कोहलीच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी

MS Dhoni & Narayan Jagadeesan
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जने आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामासाठी संघातील आठ खेळाडूंना मुक्त केले. सीएसकेने विकेटकीपर-फलंदाज नारायण जगदीसन यालाही त्यांनी मुक्त करण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर या खेळाडूने विजय हजारे टॉफीमध्ये एका पाठोपाठ चार शतके ठोकली. तमिळनाडूच्या या खेळाडूने शनिवारी (19 नोव्हेंबर) हरयाणा विरुद्ध 6 चौकार आणि 6 षषकार खेचत 128 धावांची खेळी केली.

नारायण जगदीशन (Narayan Jagadeesan) याने विजय हजारे ट्रॉफीच्या चालू हंगामात आतापर्यंत 5 सामन्यात 522 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 130.50 राहिली असून त्याच्या बॅटमधून 105.66च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. आतापर्यंत या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या स्पर्धेत 44 चौकार आणि 16 षटकार खेचले. याचा अर्थ त्याने 271 धावा चौकार-षटकारांनीच केल्या.

या सामन्यात जगदीशनबरोबर साई सुदर्शन याने 67 धावा आणि शाहरुख खान याने 46 धावा केल्या. यामुळे तमिळनाडूने 50 षटकात 7 विकेट्स गमावत 284 धावासंख्या उभारली. जगदीशनने शतक ठोकताच भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक शतके करणाऱ्यांमध्ये विराट कोहली, पृथ्वी शॉ, रुतुराज गायकवाड, देवदत्त पडिकल यांचा समावेश होता. आता त्यामध्ये जगदीसनची भर पडली आहे. या सर्वांनी प्रत्येकी चार शतके केली.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1593862190834266113?s=20&t=Y4SJfsvb4LEWFS3awVxxGg

जगदीशनने विजय हजारे ट्रॉफीच्या मागील चार सामन्यात केलेल्या धावा. त्याने नाबाद 114 (112), 107 (113), 168 (140) आणि 128 (123) धावा केल्या आहेत. Narayan Jagadeesan score hundred last 4 matches in vijay hazare and equal virat kohli record

जगदीशनला चेन्नईने 20 लाखामध्ये संघात घेतले होते. त्यानंतर तो 4 वर्ष संघात राहिला आणि त्यादरम्यान तो एमएस धोनी (MS Dhoni) याची जागा घेईल असे म्हटले जाऊ लागले, मात्र लिलावाआधीच संघाने त्याला रिलीज केले. त्याने चेन्नईकडून 2020च्या हंगामात 5 आणि 2022च्या हंगामात 2 सामने खेळले होते.

आयपीएल 2023च्या हंगामासाठी 23 डिसेंबरला लिलाव होणार आहे. या लिलावात जगदीशनला कोणता संघ आणि किती रूपयांना विकत घेईल हे उत्सुकतेचे ठरणार आहे. या लिलावात भारतीय खेळाडूंबरोबरच विदेशी क्रिकेटपटूही सहभागी होणार आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संघ सहकारीच म्हणतोय, “रिषभला ओपनिंगच करायला द्यायला हवी”
पैसाच पैसा! या दोन खेळाडूंसाठी सनरायझर्स खुली करणार आपली तिजोरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---