---Advertisement---

भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टी२०सामन्यांसाठी असा आहे विंडीजचा संघ; या दोन खेळाडूंचे झाले पुनरागमन

On: मंगळवार, जुलै 23, 2019 3:48 PM
---Advertisement---

मंगळवारी(23 जूलै) वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने पुढिल महिन्यात 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी 14 जणांचा वेस्ट इंडीजचा संघ जाहिर केला आहे.

या संघात सुनील नारायण आणि किरॉन पोलार्डने या दोन खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. तसेच 2019 विश्वचषकादरम्यान दुखापतग्रस्त झालेला आंद्रे रसलचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. पण त्याला या मालिकेआधी फिटनेस टेस्टला सामोरे जावे लागणार आहे.

असे असले तरी वेस्ट इंडिजचा अनुभवी आक्रमक फलंदाज ख्रिस गेल मात्र या टी20 मालिकेत खेळणार नाही. तो या मालिकेसाठी त्यानी अनुपलब्ध राहणार असल्याचे त्याने आधीच स्पष्ट केले होते. या मालिकेऐवजी तो कॅनडा ग्लोबल टी20 लीगमध्ये खेळणार आहे.

वेस्ट इंडीजच्या या संघात नारायण जवळजवळ 2 वर्षांनंतर पुनरागमन करणार आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना सप्टेंबर 2017मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. तसेच पोलार्डने वेस्ट इंडीजकडून त्याचा शेवटचा टी20 सामना नोव्हेंबर 2018 मध्ये खेळला आहे.

या दोघांबद्दल वेस्ट इंडीजच्या निवड समितीचे प्रभारी अध्यक्ष रॉबर्ट हाईन्स म्हणाले, ‘आम्हाला वाटते नारायण, पोलार्ड सारखे खेळाडू जे जगभरातील टी20 लीग खेळत असतात, ते एकदा फिट झाले आणि मानसिकदृष्या खेळण्यासाठी तयार असतील तर आम्ही त्यांना वेस्ट इंडीजकडून खेळण्यासाठी संधी दिली पाहिजे.’

याबरोबरच वेस्ट इंडीजच्या संघात यष्टीरक्षक फलंदाज अँथनी ब्राम्बेलचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. तसेच या संधाच खॅरी पिएर आणि जॉन कॅम्पबेलचाही समावेश आहे. या संघाचे कर्णधारपद कार्लोस ब्रेथवेट सांभाळणार आहे.

हा संघ जाहिर करताना हाईन्स यांनी पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठीच्या दृष्टीने संघ तयार करण्याचा विचार करत असल्याचे देखील सांगितले आहे.

भारताविरुद्ध होणाऱ्या ही टी20 मालिकेतील पहिले दोन सामने फ्लोरीडा येथे अनुक्रमे 3 आणि 4 ऑगस्टला होणार आहेत. त्यानंतर 6 ऑगस्टला मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गयाना येथे होईल.

असा आहे भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ – 

जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शिमरॉन हेटमेयर, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, कार्लोस ब्रॅथवेट (कर्णधार), किमो पॉल, सुनील नारायण, शेल्डन कॉट्रेल, ओशन थॉमस, अँथनी ब्राम्बेल, आंद्रे रसेल, खॅरी पिएर.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या सामन्यानंतर लसिथ मलिंगा घेणार वनडेतून निवृत्ती

मुलाखत: फायनल खेळून ट्रॉफी जिंकावी हाच निर्धार – कर्णधार जोगिंदर नरवाल

श्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment