---Advertisement---

…म्हणून पाकिस्तानने विश्वचषकासाठीच्या संघातून या युवा खेळाडूचे नाव घेतले मागे

On: शुक्रवार, जानेवारी 3, 2020 11:59 AM
---Advertisement---

पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शाहचे नाव 19 वर्षाखालील विश्वचषकासाठी निवडलेल्या पाकिस्तान संघातून मागे घेतले आहे. त्यामुळे त्याचा बदली खेळाडू म्हणून मोहम्मद वसीमला संधी मिळाली आहे.

नसीमने 2019मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले आहेत.

“19 वर्षाखालील विश्वचषक हा युवा खेळाडूंसाठी भविष्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी असते. नसीमने हा टप्पा पार करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे,” असे पीसीबीचे प्रमुख वसीम खान यावेळी म्हणाले.

“त्यामुळे पीसीबीने व्यावहारिक दृष्टिकोन समोर ठेऊन नसीमला या स्पर्धेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे युवा क्रिकेटपटूंना याचा फायदा होईल,” असेही वसीम खान यावेळी म्हणाले.

19 वर्षाखालील क्रिकेट हे युवा आणि नव्या खेळाडूंसाठी एक व्यासपीठ आहे. तसेच, नसीम हा वरिष्ठ संघाकडून खेळला आहे. तो आता वकार युनुसच्या प्रशिक्षणाखाली गोलंदाजीचा सराव करत आहे. त्याचबरोबर बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी नसीमला पाकिस्तानच्या संघात निवडले आहे, असे पीसीबीने सांगितले आहे.

पाकिस्तानकडून 16 वर्षीय नसीमने आतापर्यंत एक 19 वर्षाखालील 1 वनडे सामना खेळला. ज्यामध्ये त्याने 3 विकेट्स घेतले होते. त्याचबरोबर त्याने 19 वर्षाखालील 3 तीन दिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 7 विकेट्स घेतले आहेत.

19 वर्षाखालील विश्वचषकात पाकिस्तानने आतापर्यंत 2004 आणि 2006मध्ये 2 वेळा विजेतेपद मिळवले होते.

यावर्षीचा 19 वर्षांखालील विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत 17 जानेवारीपासून 9 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---