ख्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात सध्या २ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर रविवारपासून(३ जानेवारी) सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी स्टंप माईकमधून पाकिस्तानच्या दोन खेळाडूंमधील गमतीशीर संवाद ऐकू आला आहे.
झाले असे की पाकिस्तानच्या पहिल्या डावात ८३ व्या षटकावेळी ११ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला नसीम शहा ८ धावांवर आणि मोहम्मद अब्बास शुन्यावर फलंदाजी करत होते. यावेळी स्ट्राईकवर अब्बास होता, तेव्हा नसीम त्याला सांगत होता की त्याला एक धाव काढून दे, म्हणजे तो स्ट्राईकवर येईल.
त्यांच्यातील हे संभाषण हिंदीमध्ये सुरु होते. नसीम अब्बासला म्हणत होता, ‘अब्बास भाई, आपको पता हैं सारी जिम्मेदारी मेरे उपर हैं. सिंगल करना है वरना डांट पड जायेगी. (अब्बास भाई, तुला माहित आहे, सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. एक धाव घ्यावी लागेल नाहीतर ओरडा बसेल.)
नसीम आणि अब्बासमधील हे संभाषण स्टंप माईकमध्ये कैद झाले. त्यांच्यातील या संवादाचा व्हिडिओदेखील सध्या व्हायरल होत आहे.
https://twitter.com/AB18PK/status/1345629473027321857
https://twitter.com/Jamiljoyia3/status/1345725694907658241
या सामन्यात पाकिस्तानचा डाव ८३.५ षटकात २९७ धावसंख्येवर संपला. अखेरची विकेट नसीम शहाचीच पडली. तो १२ धावा करुन बाद झाला. त्याआधी पाकिस्तानकडून अझर अलीने ९३ आणि कर्णधार मोहम्मद रिझवानने ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच फहिम अश्रफने ४८ धावा करत योगदान दिले.
न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथीने प्रत्येकी २ विकेट्स, तसेच मॅट हेन्रीने एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा रे भावा! केवळ ६ कसोटीत तिसऱ्यांदा घेतल्या डावात ५ विकेट्स
…म्हणून सिडनी येथे होणारा कसोटी सामना ‘पिंक टेस्ट’ नावाने ओळखला जातो
केंद्रीय वित्त मंत्रालयाने टॅक्समध्ये सूट दिली नाही, तर बीसीसीआयला भरावे लागणार तब्बल ‘इतके’ कोटी






