पर्थ। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याने वेगळेच वळण घेतले आहे. या दोन देशांमध्ये क्रिकेटचे सामने आहे तर शाब्दिक चकमकी या आल्याच. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला दोन संघांच्या कर्णधारामध्ये तसेच खेळांडूमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या डावात प्रत्येक विकेटला त्याच्या पद्धतीने जल्लोष केला. यावर मात्र बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते नसरूद्दीन शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी विराटला ‘सर्वाधिक खराब स्वभाव असणारा खेळाडू’ म्हटले आहे.
“विराट कोहली हा उत्तम क्रिकेटपटू असेल पण तो सर्वाधिक खराब स्वभाव असणारा खेळाडू पण आहे. त्याचे क्रिकेटमधील कौशल्य त्याच्या वागण्यामुळे मागे पडत आहे”, असे वक्यव्य शाह यांनी फेसबुकवर केले आहे.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर विराट आणि आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन या दोघांमध्ये ही चकमक घडली होती. तर आज (17 डिसेंबर) चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला टीम पेन आणि उस्मान ख्वाजा आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करत होते. त्यावेळी तिसऱ्या दिवसाप्रमाणे कोहली आणि पेनमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक पहायला मिळाली आहे. पण यावेळी मैदानावरील पंच ख्रिस गॅफेनी आणि कुमार धर्मसेना यांनी मध्यस्थी केली आहे.
भारताच्या दुसऱ्या डावातही पेनने त्याची स्लेजिंग सुरूच ठेवली. मात्र यावेळी त्याने मुरली विजयलाही त्याचे लक्ष्य केले.
भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत 1-0 असा आघाडीवर आहे. तर त्यांना दुसरा सामना जिंकण्यासाठी 175 धावांची गरज आहे. मात्र भारताकडे पाच विकेट्सच शिल्लक आहे.
उद्या (18 डिसेंबर) या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस असून ऑस्ट्रेलियाचे उर्वरीत पाच विकेट्स घेत मालिका 1-1 अशी बरोबरी करण्याचे प्रयत्न असतील.
महत्त्वाच्या बातम्या:
–पृथ्वी शॉच्या ऐवजी टीम इंडियात निवड झालेला कोण आहे मयंक अगरवाल?
–आयपीएल लिलावात हे दोन खेळाडू होणार करोडपती
–Video: आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मुरली विजयला कोहलीबद्दल असे काही बोलला की ऐकून थक्क व्हाल!