---Advertisement---

नासिर हुसेनच्या आयपीएल संघात रोहित-विराटला स्थान नाही; ‘या’ भारतीयाला केले कर्णधार

---Advertisement---

मंगळवारी(10 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पाच विकेट्सने पराभूत करून पाचव्यावेळी आयपीएलचे जेतेपद जिंकले. याबरोबरच आयपीएलचा 13 वा हंगामही संपला. या नंतर अनेक दिग्गजांनी त्यांचे सर्वोत्तम आयपीएल संघ तयार केले होते. यात आता इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनचाही समावेश झाला आहे. त्यानेही त्याचा सर्वोत्तम आयपीएल संघ तयार केला आहे.

नासिरने त्याच्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनाही जागा दिलेली नाही. आश्चर्यकारक म्हणजे पाचव्या वेळेस मुंबई इंडियन्सचा आयपीएल जिंकणारा कर्णधार रोहित शर्माला त्याने प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे. नासिर हुसेनने आपला संघाचे सलामीवीर म्हणून किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि दिल्ली कॅपिटलचा सलामीवीर शिखर धवन यांची निवड केली आहे.

नासिर हुसेनने आपल्या आयपीएल 2020 संघाच्या कर्णधारपदी केएल राहुल याची निवड केली आहे. त्याने तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. चौथ्या क्रमांकासाठी मुंबई इंडियन्सचा युवा स्टार इशान किशनची निवड केली आहे. आयपीएल 2020 मध्ये सूर्यकुमार यादवची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्याने 16 सामन्यात 140 च्या स्ट्राइक रेटने 480 धावा केल्या आहेत

सहाव्या क्रमांकावर फलंदाजी आणि यष्टीरक्षक म्हणून नासिरने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या एबी डिव्हिलियर्सचा समावेश केला आहे. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून त्याने हार्दिक पंड्याला संघात स्थान दिले आहे. गोलंदाजांमध्ये त्याने जोफ्रा आर्चर, राशिद खान, कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांचा समावेश केला आहे.

नासिर हुसेनचा आयपीएल 2020 संघः

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, इशान किशन, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, जोफ्रा आर्चर, राशिद खान, कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

महत्त्वाच्या बातम्या –

-विरेंद्र सेहवागने तयार केला सर्वोत्तम आयपीएल संघ, विराट कोहली कर्णधार तर रोहित शर्मा…

… म्हणून, नटराजन दाढी वाढवून खेळत होता आयपीएलमध्ये; प्रशिक्षकांनी केला खुलासा

‘हा’ कर्णधार चढणार दुसऱ्यांदा बोहल्यावर; पहिल्या पत्नीपासून आहेत पाच अपत्ये

ट्रेंडिंग लेख –

…म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच!

…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!

…आणि हिटमॅन रोहित शर्मा झाला ‘स्टार क्रिकेटर’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---