सध्या सुरू असलेल्या महिला विश्वचषकाचा १५ वा सामना भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला ४ विकेट्सने पराभव पत्कारावा लागला. इंग्लंडच्या या विजयाची स्टार ठरली फलंदाज नताली सिवर. या सामन्यात कर्णधार हेदर नाइटनंतर तिने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. हेदर नाइटने ७२ चेंडूत ५३ धावा केल्या, तर नतालीने ४६ चेंडूत ४५ धावा केल्या. नतालीला या सामन्यात जीवनदान मिळाले, त्याचा तिने फायदा घेत संघाला विजय मिळवून दिला.
इंग्लंडच्या डावाच्या (IND vs ENG) ५ व्या षटकात झूलन गोस्वामीच्या ५ व्या चेंडूवर नतालीला जीवनदान मिळाले. चेंडू स्टंप्सला लागला होता, परंतु बेल्स पडल्या नाहीत. यावेळी इंग्लंड २ विकेट गमावत १२ धावांवर होता. तिला जीवनदान मिळाल्याचा संघाला फायदा झाला. तिने नंतर ४५ धावा केल्या. सिवर बाद झाली असती, तर या सामन्या भारतीय संघाला वर्चस्व गाजवण्याची जास्त संधी मिळू शकली असती. परंतु, सिवरच्या जीवनदानाचा संघाला मोठा फायदा झाला आणि हा सामना इंग्लंडने जिंकला.
जेव्हा चेंडू स्टंप्सवर जाऊन आदळला तेव्हा सिवरमने ४ धावा केल्या होत्या. पण, नंतर ४५ धावा करुन पुजा वस्त्राकारच्या चेंडूवर ती बाद झाली. तिचा झेल झूलन गोस्वामीने घेतला.
भारताचा सामन्यात पराभव
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत १३५ धावा केल्या आणि ३६.२ षटकातच संघ सर्वबाद झाला. स्म्रीती मंधानाने ३५ धावा केल्या, तर रिचा घोषने ३३ धावा केल्या. कर्णधार मिताली राज या सामन्यात सुद्धा २ धावा करुन बाद झाली. इंग्लंडकडून खेळताना चार्लोट डीनने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.
इंग्लंड संघाने ३१.२ षटकात ६ विकेट गमावत लक्ष्य गाठले. इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती आणि संघाने पहिली विकेट ३ धावांवरच गमावली होती. डेनिएल व्याट १ धाव करुन बाद झाली. टॅमी ब्यूमोंटसुद्धा ४ धावा करुन बाद झाली. यानंतर हेदर नाइट आणि नताली सिवरने इंग्लंड संघाला यश मिळवून दिले. हेदरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
भारतीय संघाने विश्वचषकात (Womens World Cup 2022) ४ सामने खेळले असून संघाला २ सामन्यांत विजयाचा तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. न्यूझीलंडने भारताला ६२ धावांनी पराभूत केले. आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश या संघांसोबत सामने खेळायचे आहे. भारतीय संघ आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा हा पहिलाच विजय होता. इंग्लंड संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटसाठी आरसीबीने पाठवलेली चक्क मोडलेली कार, तर इतर खेळाडूंचा चांगली गाडी, वाचा तो किस्सा
भज्जी पुन्हा घेणार ‘फिरकी’, करणार जोरदार ‘फटकेबाजी’; हरभजनच्या नव्या इनिंगला लवकरच सुरुवात?