---Advertisement---

हार्दिकसाठी आनंदाची बातमी! नताशा मुंबईत परतली, महिनाभरानंतर मुलाशी होणार भेट?

Hardik Pandya And Natasha Stankovic
---Advertisement---

भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे. पत्नी आणि सर्बियन मॉडल नताशा स्टॅनकोविक हिला घटस्फोट दिल्यानंतर हार्दिक आता सुट्ट्यांचा आनंद लुटाताना दिसतोय. यादरम्यान त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरुन तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा होताना दिसतायत. तर दुसरीकडे हार्दिकची माजी पत्नी नताशा सर्बियात मुलाचे संगोपन करताना दिसतेय. अशातच आता आपल्या मुलापासून दूर असलेल्या हार्दिकसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय.

नताशा सर्बियाहून मुंबईत परतली आहे. पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की, हार्दिक पांड्या आपला मुलगा अगस्त्याला भेटू शकेल की नाही?

गेल्या अनेक महिन्यांपासून हार्दिक आणि नताशा यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या अफवा होत्या. आयपीएल 2024 दरम्यान हार्दिकला चाहत्यांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. तसेच तो मुंबई इंडियन्सचा नवनिर्वाचीत कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करण्यातही अपयशी ठरला होता. या कठीण काळात नताशा त्याच्या बाजूने उभी नव्हती. तसेच टी20 विश्वचषक चॅम्पियन बनल्यानंतरही नताशाच्या बाजूने हार्दिकचे अभिनंदन करण्यात आले नव्हते. त्यानंतर हार्दिक आणि नताशाने सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले की, त्यांचे 4 वर्षे जुने नाते संपुष्टात आले आहे. यानंतर नताशा तिच्या मुलासोबत सर्बियाला निघून गेली. तिथे तिने आपल्या मुलासोबतचे अनेक फोटो सर्बियातील लोकेशन्सवरून शेअर केले होते.

विभक्त झाल्यानंतरही हार्दिक पांड्याने नताशाच्या काही फोटोंवर कमेंट केली होती. नताशाने तिच्या मुलाचे काही फोटो शेअर केले होते, ज्यात हार्दिकने हार्ट इमोजीसह कमेंट केली होती. यावरुन हार्दिकला मुलगा अगस्त्याची आठवण येत असल्याचे स्पष्ट झाले होते. आता नताशा स्वत: मुंबईत परतली आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर विमानतळ आणि मुंबईतील पावसाचे फोटो शेअर केले आहेत. मात्र, अगस्त्य तिच्यासोबत होता की नाही, याची पुष्टी या फोटोत झालेली नाही. त्यामुळे आता महिन्याभरानंतर हार्दिक आणि मुलगा अगस्त्यची भेट होईल की नाही?, हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा-

‘अर्जुन तेंडुलकरची कारकीर्द उद्ध्वत करू नका’; योगराज सिंग यांच्यावर संतापले चाहते

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 वेगवान गोलंदाज, एकही भारतीय नाही
या बाबतीत जो रूट विराटपासून खूपच दूर; पाहा किंग कोहलीचा हा विश्वविक्रम!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---