---Advertisement---

‘अर्जुन तेंडुलकरची कारकीर्द उद्ध्वत करू नका’; योगराज सिंग यांच्यावर संतापले चाहते

Arjun Tendulkar Yograj Singh
---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत योगराज सिंग यांनी एमएस धोनीविषयी वादग्रस्त विधान केले होते. याशिवाय त्यांनी कपिल देव यांच्याविरोधातही वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे चाहते त्यांना ट्रोल करत आहेत. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने लगेच योगराज सिंग यांच्यापासून दूर व्हावे, असे चाहते म्हणाले. अर्जुन हा मागील काही वर्षांपासून योगराज यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.

योगराज सिंह आणि कपिल देव यांचे संबंध कधीच चांगले नव्हते. योगराज सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कपिल देव त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून पाहत होते. त्यामुळेच त्यांना संघातून वगळण्यात आले. या मुलाखतीत ते कपिल देवबद्दल म्हणाले की, ‘मला लोकांसमोर स्वत:ला सिद्ध करायचे आहे. आज जग माझ्या पायाखाली आहे. मला इजा करणाऱ्यांपैकी एकाला कर्करोग आहे. काहींची घरे गेली आहेत तर काहींना मुलगा नाही. तुम्ही समजू शकता की मी कोणाबद्दल बोलत आहे. तो तुमचा सर्वकालीन महान कर्णधार श्री कपिल देव आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘एकदा मी कपिल देव यांना सांगितले होते की, मी असे काम करीन की जग तुमच्यावर थुंकेल. आज युवराजकडे 13 ट्रॉफी आहेत आणि त्याच्याकडे फक्त एकच आहे.’

योगराज सिंह यांच्या या मुलाखतीनंतर चाहत्यांमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळत आहे. ते सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत. 2022 मध्ये गोव्यासाठी रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकावल्यानंतर अर्जुनने सांगितले होते की, तो योगराज सिंह यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. ‘अर्जुनला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. त्याच्याकडे अप्रतिम प्रतिभा आहे, त्याला फक्त ती वाढवायची आहे.’ असे देखील त्यांनी पुढे म्हटले.

हेही वाचा-

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 वेगवान गोलंदाज, एकही भारतीय नाही
या बाबतीत जो रूट विराटपासून खूपच दूर; पाहा किंग कोहलीचा हा विश्वविक्रम!
कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ 4 खेळाडूंनी फेकले सर्वाधिक NO-BALL

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---