भारत आणि इंग्लंड (India vs England test series) यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन मैदानावर खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे (Ben Stokes won the toss and decided to bowl first). भारतीय संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल केले आहेत. शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) आणि साई सुदर्शन (Sai sudarshan) मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळत नाहीत. त्यांच्या जागी नितीश कुमार रेड्डी (Kumar Reddy), वॉशिंग्टन सुंदर Washington Sundar) आणि आकाशदीप (akashdeep) यांना संधी देण्यात आली आहे. कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. एजबॅस्टन कसोटीत अनेक माजी महान खेळाडूंनी कुलदीपचा संघात समावेश करण्याची बाजू मांडली होती. कर्णधार शुभमन गिलने (shubman gill) नाणेफेक करताना कुलदीपला संधी न देण्याचे कारण उघड केले आहे.
हेडिंग्ले कसोटीतील पराभवानंतर कुलदीप यादवला अंतिम अकरा संघात समाविष्ट करण्याची मागणी सर्व बाजूंनी झाली होती. एजबॅस्टनमधील खेळपट्टी पाहता कुलदीप अंतिम अकरा संघात स्थान मिळवण्यात यशस्वी होईल असे वाटत होते. चायनामन गोलंदाजाला संघात स्थान मिळू शकले नाही आणि त्याच्यापेक्षा वॉशिंग्टन सुंदरला प्राधान्य देण्यात आले. नाणेफेकीदरम्यान कर्णधार गिलने कुलदीपला संघात न घेण्यामागील कारणही सांगितले. तो म्हणाला, “आम्हाला या कसोटी सामन्यात कुलदीपला खेळवायचे होते, परंतु गेल्या सामन्यात आमच्या खालच्या फळीतील फलंदाजांची कामगिरी खूपच निराशाजनक होती. म्हणूनच आम्ही आमच्या फलंदाजीत काही खोली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.”
एजबॅस्टन येथील त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम इंडियाने तीन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीत त्याच्या कामाचा ताण सांभाळण्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी आकाशदीपला संधी देण्यात आली आहे. त्याच वेळी शार्दुल ठाकूरला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीवर विश्वास दाखवला आहे. त्याच वेळी साई सुदर्शनला वगळून वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.






