ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ऑफस्पिनर नॅथन लायनने (Nathan Lyon) भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी तयारी सुरू केली आहे. भारताचा उगवता स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालला (Yashaswi Jaiswal)सामोरे जाण्यासाठी त्याने इंग्लंडचा फिरकी गोलंदाज टॉम हार्टलीचा सल्ला घेतला आहे.
मागील वर्षी वेस्ट इंडिजमध्ये पदार्पणात शतक झळकावणाऱ्या जयस्वालने या वर्षाच्या सुरुवातीला मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 712 धावा केल्या होत्या. मात्र, ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवरचा वेग आणि उसळीने मुंबईच्या या फलंदाजासमोर वेगळे आव्हान असेल.
लायन म्हणाला, “मी अद्याप जयस्वालचा सामना केलेला नाही. मात्र, आम्हा सर्व गोलंदाजांसाठी हे मोठे आव्हान असेल. तो इंग्लंडविरुद्ध ज्या प्रकारे खेळला, ते मी अगदी जवळून पाहिले. मला वाटले की तो शानदार आहे.”
लायन पुढे म्हणाला, “मी टॉम हार्टली याच्याशी वेगवेगळ्या फलंदाजांच्या शैलीबाबत खूप छान गप्पा मारल्या. ज्या मला खूप मनोरंजक वाटल्या.”
लायॉन इंग्लिश काऊंटीमध्ये लँकेशायरकडून खेळला. यादरम्यान त्याला भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये 20 बळी घेणारा आणि जयस्वालविरुद्ध खेळण्याचा अनुभव असलेला खेळाडू हार्टलीशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. 2014-2015 मध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2-0 ने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पुढील चार मालिका गमावल्या आहेत. यापैकी दोन मालिका विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली (2016-17, 2018-19) तर, प्रत्येकी एक मालिका अजिंक्य रहाणे (2021) आणि रोहित शर्मा (2023) यांच्या नेतृत्वाखाली खेळली गेली.
लायन याने लायन याने यावेळी ऑस्ट्रेलिया संघ भारताला हरवण्यात यशस्वी होईल असे देखील म्हटले. मायदेशात भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचा निर्धारच त्याने यावेळी केला. लायनसह 2014-2015 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा भाग असलेला दुसरा खेळाडू केवळ वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी सॅल्यूट, मग बूट हवेत फेकला; विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाचे विचित्र सेलिब्रेशन पाहून खदखदून हसाल!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी पॅट कमिन्सने घेतला मोठा ब्रेक, कारण जाणून व्हाल हैराण
पाकिस्तान सरकारनं हाॅकी दिग्गजांचा केला अपमान?