क्रिकेटच्या मैदानावर बऱ्याचदजा क्रिकेटप्रेमींना फुल्ल टू ड्रामा पाहायला मिळतो. दोन क्रिकेटपटूंमधील बाचाबाची, क्रिकेटपटूचे पंचांशी वाद, गोलंदाज आणि फलंदाजामधील मैदानावरील तेढ क्रिकेटचाहत्यांच्या आवडीचे असते. बऱ्याचदा क्रिकेटपटूंचे सेलिब्रेशनही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. बऱ्याचशा क्रिकेटपटूंची आपापली सेलिब्रेशनची वेगळी पद्धत आहे. कधी कुणी कानावर हात ठेवून जल्लोष साजरा करतो, तर कधी कुणी बॅट वर करुन सेलिब्रेशन करतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एका आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल होतोय. क्रिकेटप्रेमींनी यापूर्वी मैदानावर कधीही असे सेलिब्रेशन पाहिले नसेल.
शहीद भगतसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एका लोकल क्रिकेट सामन्यादरम्यान विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाने असे सेलिब्रेशन केले की, सर्वजण पाहातच राहिले.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका सामन्यादरम्यान गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर विचित्र पद्धतीने सेलिब्रेशन केले. फिरकी गोलंदाजाने चेंडू टाकला आणि चेंडू फलंदाजाच्या पायाला लागला. पंचांकडे वळून गोलंदाजाने अपील केले आणि पंचांनी पायचितचा निर्णय दिला. विकेट मिळाल्याचे पाहून गोलंदाज मैदानावर मांडी घालून बसला आणि त्याने जोरदार सलामी दिली.
Comment how many bowlers and batsmen celebrations did Paaji try and copy. Tag them all 😂 #cricket #celebrations pic.twitter.com/jeJ4xzPCHe
— Rahul Dravid (@RahulDravid_270) August 15, 2024
विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाने जमिनीवर बसून केवळ सलामच केला नाही तर यानंतर इतर विचित्र गोष्टीही केल्या. त्यानंतर गोलंदाजाने पायातला बूट काढून कानाला लावला आणि फोनवर बोलण्याचे नाटक करू लागला. बरं, विकेटचा जल्लोष इथेच थांबला नाही, त्याने हा बूट हवेत फेकला. यानंतर तो जमिनीवर झोपला आणि पुश अप्स करू लागला.
विकेट घेतल्याचा आनंद स्पिनरच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आणि त्याचा उत्साह एवढा होता की तिथे उपस्थित प्रत्येकजण चकित होऊन त्याचे सेलिब्रेशन पाहात होता. विकेटच्या या विचित्र सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी, कोहली की रोहित सर्वोत्तम कर्णधार कोण? बुमराहनं केला मोठा खुलासा
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी पॅट कमिन्सने घेतला मोठा ब्रेक, कारण जाणून व्हाल हैराण
पाकिस्तान सरकारनं हाॅकी दिग्गजांचा केला अपमान?