---Advertisement---

‘मला भारतात कसोटी मालिका खेळून जिंकायची आहे’, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य

Nathan lyon
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनने नुकत्याच संपलेल्या ऍशेस मालिकेतील तीन कसोटी सामने वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. लायनला दुसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली, ज्यामुळे तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला. या दुखापतीपूर्वी हा वरिष्ठ गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता आणि त्याने 3 डावात 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने या बद्दल वक्तव्य मोठे केले आहे.

क्रिकेट.कॉम सोबत बोलताना नॅथन लायन (Nathan Lyon) म्हणाला की, “जर मी या स्पर्धेतील संपुर्ण सामने खेळू शकलो असतो तर, मी या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघासाठी खूप चांगली कामगिरी करून दोन्ही संघात मोठा फरक पाडला असता. असे समजू नका की मी हे अहंकारात बोलत आहे.पण मला माझ्यावर विश्वावास आहे. पुनर्वसनात माझी ही पहिलीच वेळ आहे आणि हा पूर्णपणे नवीन अनुभव आहे. मला क्रिकेट न्यू साउथ वेल्स आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पूर्ण पाठिंबा मिळाला आहे, चांगले चालले आहे. माझ्या दुखापतीने मला खूप त्रास होत आहे. मात्र ते उन्हाळ्या पर्यंत बरे होईल.”

ऑस्ट्रेलिचा स्टार फिरकीपटू पुढे म्हणाला की, “मला भारत आणि इंग्लड दौऱ्यावर जावून कसोटी सामन्यात संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. परंतु, मला अजूनही तसे करता आले नाही. यामुळे मला पुढे अजून खेळायचे आहे.”

आता भारतीस संघ आणि ऑस्ट्रेलियन संघ यांच्यात 2027 मध्ये भारतात कसोटी सामना होणार आहे. सोबतच इंग्लड मध्येही याच वर्षी ऍशेस मालिका खेळवली जाणार आहे. तोपर्यंत लायन 40 वर्षाचा होईल. आता हे पाहणे मनोरंजनाचे ठरणार आहे की, लायन 40 वर्षाचा झाल्यानंतरही त्याला संघात आपले स्ठान वाचवता येईल का? आणि त्याचे हे स्वप्न पुर्ण होईल का. (nathan lyon talk about his dream to play india and ashes series in engalnd)

महत्वाच्या बातम्या-  
काय सांगता! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ईशान ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी?, वाचा सविस्तर 
नीरजच्या पदरी निराशा! झुरिक डायमंड लीगमध्ये मानावे लागले रौप्य पदकावर समाधान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---