भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील इंदोर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन याने जबरदस्त कामगिरी केली आहे. लायनने तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस गाजवत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले. त्याने भारताच्या दुसऱ्या डावात तब्बल आठ बळी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सर्वात यशस्वी गोलंदाज होण्याची कामगिरी करून दाखवली.
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव केवळ 109 धावांवर गुंडाळला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर 4 गडी गमावत 46 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा मोठी आघाडी घेण्याचा मनसुबा रविचंद्र अश्विन व उमेश यादव यांनी हाणून पाडला. दोघांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचा डाव 197 धावांवर संपवला.
मात्र, भारताच्या दुसऱ्या डावात नॅथन लायनने भारतीय फलंदाजांची दैना उडवली. त्याने 60 पैकी 23.3 षटके गोलंदाजी करताना 64 धावा देत 8 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासोबतच त्याच्या नावे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून नोंद झाली. त्याने याबाबतीत भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याला मागे टाकले.
आता लायनच्या नावे 113 बळी जमा आहेत. तर, अनिल कुंबळे यांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 111 फलंदाजांची शिकार केली होती. भारतीय संघाचा दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी लायन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याच्यापुढे दुसऱ्या क्रमांकावर 106 बळींसह रविचंद्रन अश्विन उभा ठाकलेला. मात्र, आता लायनने त्याला देखील मागे सोडत अव्वलस्थान पटकावले आहे.
यासोबतच भारतात येऊन भारतात एकाच गावात आठ किंवा त्यापेक्षा अधिक बळी दोनदा घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. मागील दौऱ्यावर बेंगलोर कसोटीत त्याने अशी कामगिरी केली होती.
(Nathan Lyon Took Most Wickets In Border-Gavaskar Trophy History Going Ahead Anil Kumble And R Ashwin)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी कर्णधार असतो, तर त्याच्यासाठी…’, फ्लॉप ठरत असलेल्या राहुलला मिळाला आणखी एका दिग्गजाचा पाठिंबा
वडिलांना गमावल्यानंतर खचला नाही उमेश, पुनरागमन करताच गाठली बळींची ‘शंभरी’, आता लक्ष्य नव्या रेकॉर्डवर