---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेटवर मॅच फिक्सिंगची सावली, दोषी आढळल्याने ‘हा’ युवा क्रिकेटर निलंबित

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 2:56 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बऱ्याच काळापासून विविध वादांमुळे चर्चेत आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर आता स्पॉट फिक्सिंगची सावली या बोर्डावर घिरट्या घालत आहे. पाकिस्तानचा १९ वर्षांखालील खेळाडू आणि प्रथम श्रेणीचा फलंदाज झीशान मलिक याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गुरुवारी (१४ ऑक्टोबर) तात्पुरत्या काळासाठी निलंबित केले आहे. त्याच्यावर आयसीसीच्या आचारसंहितेचे पालन न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, झीशान फिक्सिंगच्या आरोपात अडकला आहे. झीशानने स्वतः फिक्सिंग केले नाही परंतु त्याने याबद्दल माहिती असूनही बोर्डाला सांगितले नाही. हे फिक्सिंग नुकत्याच संपलेल्या नॅशनल टी२० चॅम्पियनशिप दरम्यान घडले. पीसीबीने आरोप केला आहे की, झीशानने ‘स्पॉट फिक्सिंग’च्या ऑफरबद्दल बोर्डाला कळवले नाही. पीसीबीने नॉर्दर्न क्रिकेट असोसिएशनच्या या खेळाडूला लाचलुचपत प्रतिबंधक संहितेच्या कलम ४.७.१ अन्वये निलंबित केले आहे, याचा अर्थ तो तपास होईपर्यंत क्रिकेटशी संबंधित कोणत्याही कार्यात भाग घेऊ शकणार नाही.

पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, ‘अँटी करप्शन युनिट’ झीशानला सामन्यांदरम्यान ‘स्पॉट-फिक्स’ ऑफर केल्याच्या घटनेची चौकशी करत आहे. कारण संबंधित अधिकाऱ्यांना याची त्वरित माहिती दिली गेली नव्हती. चौकशी होईपर्यंत झीशानला पूर्णपणे निलंबित करण्यात आले आहे. लाहोरमध्ये बुधवारी (१४ ऑक्टोबर) राष्ट्रीय टी -२० चॅम्पियनशिपचा समारोप झाला. राष्ट्रीय टी -२० चषकात झीशान नॉर्दर्न क्रिकेट असोसिएशनसाठी पाच सामने खेळला. या दरम्यान त्याने २४.६० च्या सरासरीने १२३ धावा केल्या. त्यांचा संघ उपांत्य फेरीतून बाद झाला आहे.

मलिक पहिल्यांदा प्रकाशझोतात आला जेव्हा त्याने २०१६ मध्ये १९ वर्षांखालील चषकात चमकदार कामगिरी केली होती. त्या स्पर्धेत त्याने ५६.२५ च्या सरासरीने २२५ धावा केल्या होत्या. रावळपिंडीचा असलेला या खेळाडूने २०१६ मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत तो या स्पर्धेच्या पाच हंगामात खेळला आहे. त्याने २०१९-२० हंगामात नॉर्दर्नसाठी ७८० धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी ५२ होती. त्याने लिस्ट एमध्ये १७ सामने खेळले आहेत ज्यात त्याने ३७.०० च्या सरासरीने ६२९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर, २१ देशांतर्गत टी -२० सामन्यांमध्ये त्याने २७.९० च्या सरासरीने फलंदाजी करत ५८६ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताविरुद्धच्या टी२० विश्वचषक सामन्यापूर्वी पाकिस्तानचा गेम प्लॅन, ‘हा’ फलंदाज आझमसोबत करणार ओपनिंग

चेन्नई वि. कोलकाता अंतिम सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

अंतिम सामन्यात ‘कॅप्टनकूल’ धोनी करणार असा विक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---