---Advertisement---

IND vs NZ: फायनलच्या विजयासाठी देशभरातून प्रार्थना; सूर्यकुमार यादव इतिहास घडवण्यासाठी सज्ज!

On: रविवार, मार्च 8, 2026 6:38 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी टी-२० विश्वचषकाचा (T20 World Cup Final) अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याबाबत भारताच्या कानाकोपऱ्यात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात लोक विजयासाठी प्रार्थना करत आहेत. धर्मनगरी काशीमध्ये टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींनी भारतीय संघाच्या विजयासाठी अस्सी घाट येथे हवन करून साकडे घातले. (In the holy city of Kashi, cricket fans performed a ‘Havan’ and offered prayers at Assi Ghat for the Indian team’s victory ahead of the T20 World Cup final)

​भारतीय क्रिकेट संघ इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे. गेल्या सव्वा दोन वर्षांत टीम इंडियाने चार वेळा आयसीसी (ICC) टूर्नामेंटची फायनल खेळली आहे. यामध्ये संघाने २ वेळा विजय मिळवला आहे, तर २ वेळा पदरी निराशा आली आहे. भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद दक्षिण आफ्रिकेला हरवून, तर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद न्यूझीलंडला पराभूत करून पटकावले होते. जून २०२३ मधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) आणि नोव्हेंबर २०२३ मधील एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या दोन्ही वेळा समोरचा प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलिया होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---