---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या टी नटराजनची चिमुकली पाहिलीत का? पाहा तिचा फोटो

On: मंगळवार, फेब्रुवारी 23, 2021 12:48 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील चमकदार कामगिरीनंतर भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज टी नटराजन सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती घेतल्यानंतर तो आपली पत्नी व मुली सोबत दिसून आला. नटराजनने आपल्या ट्विटर अकाउंटवरून कुटुंबासोबतचे छायाचित्र शेअर केले आहे.

नटराजनने शेअर केले मुलीचे पहिले छायाचित्र

नटराजन सध्या विश्रांती घेत आहे. त्यावेळी तो आपली पत्नी व चार महिन्यांची मुलगी हन्विकासोबत दिसून आला. आपल्या घराबाहेर पारंपारिक वेशात हे दांपत्य उभे असलेली दिसत आहे.

या छायाचित्राला नटराजनने कॅप्शन देताना लिहिले, ‘आमची छोटीशी परी हन्विका. तू आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेट आहेस. तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात आनंद आला. तुझे पालक म्हणून आम्हाला निवडण्यासाठी धन्यवाद. तुझ्यावर आम्ही असेच प्रेम करत राहू.’ नटराजनची मुलगी हन्विका चार महिन्यांची झाल्याने नटराजनने हे छायाचित्र सार्वजनिक केले आहे.

मुलीच्या जन्मावेळी उपस्थित नव्हता नटराजन

नटराजन युएई येथे आयपीएल खेळत असताना त्याची मुलगी हन्विका हिचा जन्म झाला होता. तिच्या जन्माच्या दोन दिवसानंतरच त्याची भारतीय संघात निवड झाल्यानं तो दुबईमार्गे ऑस्ट्रेलियाला गेला होता. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण दौरा संपल्यानंतर जवळपास अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर त्याने आपल्या मुलीला पाहिले होते.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केली चमकदार कामगिरी

सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेट बॉलर म्हणून निवड झाली. मात्र, वरूण चक्रवर्ती दुखापतग्रस्त झाल्याने, त्याची टी२० संघात निवड करण्यात आली. तसेच, कॅनबेरा वनडेतून त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. टी२० मालिकेत आपल्या धारदार यॉर्कर व किफायतशीर गोलंदाजीने त्याने ऑस्ट्रेलियन संघाला जखडून ठेवत भारताला मालिका विजय मिळवण्यात मदत केली. ब्रिस्बेन कसोटीतून कसोटी पदार्पण करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात त्याचा खारीचा वाटा होता.

ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या दौऱ्यामुळे त्याला सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. मात्र, १२ मार्चपासून सुरू होणाऱ्या टी२० मालिकेसाठी १९ सदस्यीय भारतीय संघात त्याची निवड झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsENG: अरे व्वा! टी२० आणि वनडे मालिकेची कॉमेंट्री करणार ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू

कोरोना पाठलाग सोडेना! विजय हजारे ट्रॉफीतील ३ खेळाडू पॉझिटिव्ह, पूर्ण संघाची होणार चाचणी

जगातील दहा ‘असे’ दुर्दैवी क्रिकेटपटू, ज्यांना क्रिकेटच्याच मैदानावर गमवावे लागले आपले प्राण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---