भारत आणि इंग्लंड यांच्यातील ४ कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर, हे दोन्ही संघ ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या टी२० मालिकेनंतर पुणे येथे ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेत भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक समलोचकाची भूमिका पार पडणार आहे. .
भारतीय संघासाठी ३२ टी -२० आणि ९४ वनडे सामने खेळलेला दिनेश हा १२ मार्चपासून सुरु होत असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेत समालोचकाची भूमिका बजावणार आहे. ही गोष्ट अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, दिनेश पहिल्यांदाच कॉमेंट्री पॅनलचा भाग असणार आहे.
दिनेश सोबतच स्टुअर्ट ब्रॉड, डेविड लॉयड, नासिर हुसैन, माइकल आर्थटन, इयान वार्ड, रोब की आणि एनॉय रेनफोर्ड-ब्रेंट यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू देखील समलोचकाची भूमिका पार पाडणार आहेत. परंतु दिनेशच्या समलोचनाचा आनंद भारतीय प्रेक्षकांना घेता येणार नाही. कारण भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिका स्टार स्पोर्ट्स प्रक्षेपित करत आहे. दिनेशच्या समलोचनाचा आनंद फक्त स्काय स्पॉर्टच्या प्रेक्षकांना घेता येणार आहे.
दिनेश कार्तिक सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटक संघाकडून खेळत आहे. याआधी त्याने सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा देखील खेळली होती. एवढेच नव्हे तर, त्याच्या तमिळनाडू संघाला विजेतेपदही मिळवून दिले होते. भारतीय संघासाठी त्याने २०१९ विश्वचषक नंतर एकही सामना नाही खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना पाठलाग सोडेना! विजय हजारे ट्रॉफीतील ३ खेळाडू पॉझिटिव्ह, पूर्ण संघाची होणार चाचणी
जगातील दहा ‘असे’ दुर्दैवी क्रिकेटपटू, ज्यांना क्रिकेटच्याच मैदानावर गमवावे लागले आपले प्राण
अहमदाबाद कसोटीत कोहली रचणार इतिहास, धोनीच्या ‘या’ मोठ्या विक्रमाला काढणार मोडीत