---Advertisement---

काउंटी क्रिकेटमध्ये खणकतय नवदीप सैनीचं नाणं, पदार्पणाच्या सामन्यातच बनला ‘मॅन ऑफ द मॅच’

On: शनिवार, जुलै 23, 2022 4:44 PM
Navdeep-Saini
---Advertisement---

भारताचा २९ वर्षीय वेगवान गोलंदाज नवदीप सैनी सध्या काउंटी क्रिकेटमध्ये केंट संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. सैनीने काउंटी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात त्याने जबरदस्त प्रदर्शन कले आणि केंट संघाला १७७ धावांनी विजय मिळवून दिला. वारविकशायर संघाविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या. 

केंट संघाला विजय मिळवून देण्यासाठी नवदीप सैनी (Navdeep Saini) याचे प्रदर्शन सर्वात महत्वाचे ठरले. याच कारणास्तव त्याला सामना संपल्यानंतर सामनावीर पुरस्कार दिला गेला. सामनावीर ठरल्यानतंर त्याने मोठी प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर केंट क्रिकेटसोबत बोलताना त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे.

तो म्हणाला की, “मी लीस्टरमध्ये वॉर्म-अप सामना खेळत होतो. तो सामना खेळल्यानंतर मी काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. मला इथे खूप काही शिकण्याची संधी मिळत आहे आणि माझी गोलंदाजी दिवसेंदिवस अधिकच सुधारत चालली आहे. इथे वातावरणात खूप बदल होताना दिसतो. कधी सूर्यप्रकाश पडतो, तर कधी ढगाळ वातावरण असते.”

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर वारविकशायरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. केंट संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर अवघ्या १६५ धावा करून सर्वबाद झाला. अशात पहिल्या डावात गोलंदाजीसाठी आलेल्या केंट संघाला झटपट विकेट्स घेण्याची गरज होती आणि नवदीप सैनीने संघाची ही गरज पूर्ण केली. त्याने पहिल्या डावात १८ षटकांमध्ये ७२ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या. वारविकशायरचा पहिला डाव २२५ धावांवर गुंडाळला गेला.

त्यानंतर दुसऱ्या डावात मात्र केंट संघाने समाधानकारक फलंदाजी केली आणि शेवटच्या डावात वारविकशायरला विजयासाठी ३२५ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात वारविकशायर संघ अवघ्या १४७ धावांवर गुंडाळला गेला. परिणामी केंटने तब्बल १७७ धावांच्या अंतराने विजय मिळवला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

पाच वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पठ्ठ्या म्हणतोय, “आता वनडेचा खेळ खल्लास”

वेस्ट इंडीजविरुद्धच्या लाईव्ह सामन्यात कर्णधार धवनने केले ‘हे’ कृत्य, समालोचकांच्याही बत्त्या गुल

वाढदिवस विशेष: बुद्धिबळ खेळायला पैसे नसल्याने क्रिकेटर झालेला भारताचा स्टार खेळाडू ‘युजवेंद्र चहल’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---