---Advertisement---

SLvIND: पडीक्कलच्या फॉर्मने वाढवली टीम इंडियाची चिंता, सैनीच्या गोलंदाजीवर दिसला संघर्ष करताना

On: शुक्रवार, जुलै 9, 2021 12:10 PM
---Advertisement---

येत्या काही दिवसांतच भारताचा नवा संघ श्रीलंकाविरुद्ध त्यांच्याच भूमीत मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. १३ जुलैपासून वनडे सामन्याने भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात होणार आहे. तर २५ जुलै रोजी टी२० सामन्याने या दौऱ्याचा अंत होणार आहे. अगदी तोंडावर आलेल्या या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेटपटू इंट्रा-स्क्वॉड सामन्यांद्वारे तयारी करत आहेत. दरम्यान भारताचा युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कल आपल्याच सहकाऱ्यांपुढे संघर्ष करताना दिसल्याने संघाची चिंता वाढली आहे.

जुलै ७, पासून भारतीय संघाने दुसरा इंट्रा-स्क्वॉड सराव सामना खेळण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही कर्णधार शिखर धवन आणि उपकर्णधार भुवनेश्वर कुमार यांचे संघ आमनेसामने होते. या सामन्यात २१ वर्षीय पडीक्कल लौकिकास साजेशी खेळी करू शकला नाही. मोठमोठे फटके मारण्यासाठी ओळखला जाणारा पडीक्कल या सामन्यात एक धाव घेण्यासाठीही संघर्ष करताना दिसला.

वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने त्याला आपल्या गोलंदाजीत अडकवून ठेवले. अखेर त्यानेच पडीक्कलला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. श्रीलंका क्रिकेटने भारतीय संघाच्या दुसऱ्या इंट्रा-स्क्वॉड सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांनी शानदार लयीत असलेल्या गोलंदाज सैनीचे कौतुक केले आहे. परंतु स्फोटक फलंदाज पडीक्कल खराब फॉर्ममध्ये असल्याचे पाहून चिंताही व्यक्त केली आहे.

Team India's 2nd Intra-Squad Game | India tour of Sri Lanka 2021

श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांद्वारे युवा क्रिकेटपटू पडीक्कल आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करू शकतो. जर त्याला संघात जागा मिळाली तर कामगिरीचा ठसा उमटवत आगामी टी२० विश्वचषकात जागा निश्चित करण्याचीही त्याच्याकडे सुवर्णसंधी असेल. अशात हा युवा शिलेदार श्रीलंकेविरुद्ध कसे प्रदर्शन करेल? हे पाहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

गिलच्या पर्यायी खेळाडूवरुन कोहली-निवडकर्ते आमनेसामने, बीसीसीआय अध्यक्षाची आली प्रतिक्रिया

आयसीसीने उचलले मोठे पाऊल, ‘या’ कारणामुळे मनु साहनींची सीईओ पदावरुन हकालपट्टी

दुःखद बातमी! महाराष्ट्राचे माजी अष्टपैलू कालवश, हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---