न्यूझीलंड अ संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना बेंगलोरमध्ये खेळला जात जात आहे. या सामन्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघ घोषित केला होता. आता या संघात एक मोठा बदल झाला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप संनीला दुखापत झाल्याचे समोर येत आहे.
न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात नवदीप सैनी (Navdeep Saini) याला सहभागी केले गेले होते. संजू सॅमलन (Sanju Samson) या संघाचे नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार नवदीप सैनीला उजव्या बाजूला ग्रोइन एंजरी झाली आहे. सध्या सुरू असलेल्या दिलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याला ही दुखापत झाल्याचे सांगितले गेले आहे. दुखापतीमुळे तो या सामन्यातून बाहेर झाला आहे. तसेच न्यूझीलंड अ संघाविरुद्ध देखील तो खेळू शकणार नाहीये. भारताच्या नवड समितीने या मालिकेसाठी सैनीच्या बदली खेळाडूच्या रूपात ऋषी धवन याला संघात घेतले आहे.
भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील या दोन्ही मालिका अनऑफिशियल आहेत. कसोटी मालिकेनंतर 22 सप्टेंबर रोजी उभय संघातील एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना 25 सप्टेंबर, तर तिसरा सामना 27 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.
न्यूझीलंड अ संघाविरुद्ध खेळण्यासाठी निवडलेला भारत अ संघ –
पृथ्वी शॉ, अभिमन्यु ईश्वरन, ऋतुराज गायकवाड़, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सैमसन (कर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, ऋषि धवन आणि राज अंगद बावा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारत-दक्षिण आफ्रिकेचा सामना धोक्यात! केरळच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमची लाईटच केली कट
काय सांगता, पीसीबीसाठी फुकटची हमाली करतात अध्यक्ष रमीज राजा! म्हटले, ‘घरच्यांची इच्छा नव्हतीच…’
क्रिडाविश्वात हळहळ! चालू मॅरथॉन स्पर्धेत धावपटूवर ओढावला मृत्यू