पॅरिस पॅरालिम्पिक 2024मध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेकपटू नवदीप सिंग सध्या चर्चेत आहे. नवदीपने पुरुषांच्या भालाफेक एफ41 स्पर्धेत 47.32 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते. या विजयी कामगिरीनंतर नुकतीच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना टोपी घालायला लावली. आता नवदीप सिंगने त्याच्या आवडत्या क्रिकेटरच्या नावाचा खुलासा केला आहे. नवदीप सिंगची तुलना आता विराट कोहलीसोबत केली जात आहे.
विराट कोहलीच्या शैलीत भाला फेकल्यानंतर त्याने आक्रमकपणे सेलिब्रेशनही केले होते. दरम्यान, नवदीप सिंगने त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूचे नाव उघड केले आहे. नवदीपने शुभंकर मिश्राला यूट्यूबवर सांगितले की, “विराट खूप चांगला खेळतो. त्याने द्विशतक केले आहे. किती खेळी होती ती! तेव्हापासून मी त्याचा चाहता आहे. विराट कोहली महान खेळाडू आहे पण माझा आवडता क्रिकेटपटू रोहित शर्मा आहे.”
दरम्यान नवदीपने 47.32 मीटर फेक करून पॅरालिम्पिकचा विक्रमही मोडला. नवदीप सिंगने सुरुवातीला पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. त्यावेळी इराणच्या सदेघ बेट सायाहने 47.64 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले होते. तर चीनच्या सन पेंग्झियांगने 44.72 मीटरसह कांस्यपदक जिंकले होते. मात्र, सायाहला अपात्र ठरवण्यात आले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याने दहशतवादी संघटना आणि जिहादशी संबंधित झेंडा दाखवला होता. यामुळे नवदीपचे रौप्यपदक सुवर्णपदकात बदलले.
नवदीप सिंग भारताचा ऑलिम्पिक स्टार नीरज चोप्राला आपला आदर्श मानतो. हरियाणामध्ये जन्मलेल्या नवदीप सिंगची उंची केवळ 4 फूट 4 इंच आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकाशिवाय नवदीपने वर्ल्ड पॅरा ग्रांप्री आणि आशियाई युवा पॅरा गेम्समध्येही सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 2024 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्यपदक जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
रियान पराग किंवा हार्दिक पांड्या नव्हे तर ‘हा’ भारतीय क्रिकेटर आहे अनन्या पांडेचा क्रश
पाकिस्तानला मोठा दिलासा! फाॅर्ममध्ये परतला ‘हा’ स्टार फलंदाज
“माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय आहेस तू”, वाढदिवशी पत्नी देविशाकडून सूर्यकुमारला प्रेमळ शुभेच्छा