23 जून हा दिवस अफगाणिस्तान क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला आहे. या दिवशी अफगाणिस्ताननं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव करत मोठा उलटफेर केला. या सामन्यात अफगाणिस्ताननं प्रत्येक विभागात शानदार कामगिरी केली. अफगाणिस्तानच्या या ऐतिहासिक विजयात वेगवान गोलंदाज नवीन उल हकनं महत्त्वाची भूमिका बजावली. आता विजयानंतर नवीननं त्याच्या सोशल मीडिया अकऊंटवरून एक विचित्र पोस्ट शेअर केली, जी वेगानं व्हायरल होत आहे.
अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर नवीन उल हकनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक विचित्र पोस्ट शेअर केली. नवीननं पोस्टमध्ये एक कोलाज टाकलं आहे. कोलाजमध्ये दोन फोटो वापरण्यात आली आहेत. एकामध्ये स्टेडियमच्या एका बाजूला रिकाम्या जागा खूर्च्या आहेत आणि तेथे फक्त एक समर्थक बसलेला आहे. या फोटोवर ‘सपोर्ट’ असं लिहिलेलं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये संपूर्ण स्टेडियम भरलेलं दिसत असून त्यावर ‘अभिनंदन’ लिहिलेलं आहे. नवीन उल हकला या पोस्टद्वारे काय म्हणायचं आहे हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्याची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
नवीन उल हकनं अफगाणिस्तानच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानं या सामन्यात कांगारू संघाच्या अव्वल फळीला उद्ध्वस्त केलं. नवीननं पहिल्याच षटकात धोकादायक ट्रॅव्हिस हेडला खातं न उघडता पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर त्यानं ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शला 12 धावांवर बाद केलं. यानंतर त्यानं ॲस्टर आगरची विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 षटकांच्या स्पेलमध्ये नवीन उल हकनं केवळ 12 धावा देत 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. नवीन उल हकसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज खूप संघर्ष करताना दिसले. या सामन्यात नवीन व्यतिरिक्त गुलबदिन नायबनं अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकात 20 धावा देत 4 बळी घेतले. या दोन गोलंदाजांच्या जोरावर अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 127 धावांवर रोखला.
महत्त्वाच्या बातम्या –
हरवलेला चेंडू शोधण्यासाठी विराट कोहलीची तारांबळ! व्हिडिओ पाहून चाहत्यांनी लुटला आनंद
सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचं भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जोरदार स्वागत! या खेळाडूनं जिंकलं सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं मेडल
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार दुखावला, भारताला इशारा देत केलं मोठं वक्तव्य