अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक याने बुधवारी (27 सप्टेंबर) मोठी घोषणा केली. आगामी वनडे विश्वचषकात नवीन अफगाणिस्तानसाठी खेळताना दिसणार आहे. पण पण ही स्पर्धा संपल्यानंतर तो वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे वेगवान गोलंदाजाने घोषित केले.
नवीन उल हक (Naveen Ul Haq) याचे वय अवघे 24 वर्ष असून अफगाणिस्तानसाठी त्याने महत्वाचे योगदान दिले आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याला आतापर्यंत 7 सामने, तर टी-20 क्रिकेटमध्ये 27 सामने खेळण्याची संधी दिली गेली आहे. आगामी वनडे विश्वचषकात देखील त्याची भूमिका अफगाणिस्तानसाठी महत्वाची राहणार आहे. आतापर्यंतच्या वनडे कारकिर्दीत त्याला 14 विकेट्स मिळाल्या आहेत. यावर्षीच्या विश्वचषकात हा आकडा किती विकेट्सपर्यंत जातो, हे पाहण्यासारखे असेल. टी-20 कारकिर्द मोठी करण्यासाठी नवीनने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत त्याने ही माहिती चाहत्यांना दिली.
https://www.instagram.com/p/Cxstu_HvnDA/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, नवीन उल हक आणि भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली () यांच्यातील वात चांगलाच चर्चेत राहिला. इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामात विराट आणि नवीन यांच्यात हा वाद झाला होता. भारताचा माजी दिग्गज गौतम गंभीर देखील या वादात सामील झाल्याने याविषयी माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा होती. वनडे विश्वचषका 2023 मध्ये पुन्हा एकदा विराट आणि नवीन आमने सामने असतील. दोघांमधील संघर्ष विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो.(Naveen Ul Haq will retire from ODI after the World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
कमबॅकसाठी केन विलियम्सन तयार! सराव सामन्याआधी दिली खास प्रतिक्रिया
World Cup Countdown: वीरू-धोनीची वर्ल्डकपमध्ये फाईव्ह स्टार कामगिरी, असा आहे तो विक्रम