पुणे । डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटसयांच्या तर्फे आयोजित पहिल्या एक्सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत रिग्रीन, मेटा स्कुल या संघांनी अनुक्रमे गॅलक्सी व आयएसजीईसी या संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
धायरी येथील स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी व व्हिजन स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात किरण नवगिरे(नाबाद 54धावा व 1-13)हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रिग्रीन संघाने गॅलक्सी संघाचा 9गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
थम फलंदाजी करताना गॅलक्सी संघाने 20षटकात 6बाद 126धावांचे आव्हान उभे केले. यात ऋतुजा देशमुख 35, संजूला नाईक 20, मनाली जाधव 17, शिवानी बुक्ते 14यांनी संघाच्या डावाला आकार दिला.
रिग्रीनकडून प्रिया भोकरे(2-33), किरण नवगिरे(1-13), श्रद्धा पाखरकर(1-16), उत्कर्ष देशपांडे(1-17)यांनी सुरेख गोलंदाजी करत गॅलक्सी संघाला 126धावांवर रोखले. 126धावांचे आव्हान रिग्रीन संघाने14षटकात 1गडयाच्या बदल्यात 129धावा करून पूर्ण केले.
भक्ती शास्त्रीने 38चेंडूत 7चौकारांच्या मदतीने नाबाद 53धावा व किरण नवगिरेने 34चेंडूत 6चौकार व 2षटकारांच्या मदतीने नाबाद 54धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्याची मानकरी किरण नवगिरे ठरली.
दुसऱ्या सामन्यात पूनम खेमनार(1-15 व नाबाद 49धावा)हिने केलेल्या कामगिरीच्या जोरावर मेटा स्कुल संघाने आयएसजीईसी संघावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पहिल्यांदा खेळताना मेटा स्कुल संघाच्या गोलंदाजीपुढे आयएसजीईसी संघाचा डाव 20षटकात 8बाद 64धावावर संपुष्टात आला.
यात साक्षी शालगणकर 14(31), ज्ञानेश्वरी वाघ 12यांनी थोडासा प्रतिकार केला. मेटा स्कुलकडून कल्याणी चावरकर 3-3, उत्कर्षा पवार 2-12, सोनाली शिंदे 1-6, पूनम खेमनार 1-15, प्रांजली पाटील 1-4)यांनी भेदक गोलंदाजी करत संघाच्या विजयाचा पाया रचला.
हे आव्हान मेटा स्कुल संघाने अवघ्या 4.5षटकात एकही गडी न गमावता 66धावा करून पूर्ण केले. पूनम खेमनारने नाबाद 49धावा, आदिती काळेने नाबाद 12धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर हा ‘किताब पूनम खेमनारला देण्यात आला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
गॅलक्सी: 20षटकात 6बाद 126धावा(ऋतुजा देशमुख 35(42,4×4), संजूला नाईक 20(13,1×4,2×6), मनाली जाधव 17(25), शिवानी बुक्ते 14(10), प्रिया भोकरे 2-33, किरण नवगिरे 1-13, श्रद्धा पाखरकर 1-16, उत्कर्ष देशपांडे 1-17)पराभूत वि.रिग्रीन: 14षटकात 1बाद 129धावा(भक्ती शास्त्री नाबाद 53(38,7×4), किरण नवगिरे नाबाद 54(34,6×4,2×6), तेजल हसबनीस 12(12), संजूला नाईक 1-16);सामनावीर- किरण नवगिरे;
आयएसजीईसी: 20षटकात 8बाद 64धावा(साक्षी शालगणकर 14(31), ज्ञानेश्वरी वाघ 12(38), कल्याणी चावरकर 3-3, उत्कर्षा पवार 2-12, सोनाली शिंदे 1-6, पूनम खेमनार 1-15, प्रांजली पाटील 1-4)पराभूत वि.मेटा स्कुल: 4.5षटकात बिनबाद 66धावा(पूनम खेमनार नाबाद 49(19,10×4), आदिती काळे नाबाद 12(11,1×4)no.);सामनावीर-पूनम खेमनार.