भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS)यांच्यातील दुसरा टी20 सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना विदर्भ क्रिकेट एसोसिएशन ग्राउंड, नागपूर येथे खेळला जाणार आहे, मात्र नागपूरमध्ये मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. यामुळे सामना रद्द होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच विदर्भ क्रिकेट असोसिएशननेही याबाबत नाराजी व्यक्त केली, कारण सामन्याच्या दिवशी पाऊस पडणार याचा अंदाज वर्तवला आहे.
बुधवारी (21 सप्टेंबर) दोन्ही संघ जेव्हा नागपूरमध्ये पोहोचले तेव्हाच थोडा पाऊस सुरू होता. तर गुरूवारी सकाळी जोरदार पाऊस पडला. यामुळे दोन्ही संघाचे अभ्यास सत्र रद्द करण्यात आले. सध्या नागपूरमध्ये ढगाळ वातावरण असून सामन्यावेळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 45000 आसन क्षमता असणाऱ्या या स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्याचे सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहेत.
नागपूरमध्ये मोठ्या काळानंतर आंतरराष्ट्रीय सामना होणार असल्याने चाहत्यांनी काही मिनिटांतच तिकिटे खरेदी केली होती. त्यातच पाऊस पडला आणि सामना नाही झाला तर तिकीटधारकांना पैसे परत करण्याची वेळ येऊ शकते.
या मैदानावर झालेल्या 12 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांपैकी 9 सामने फलंदाजी प्रथम करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. मोहालीच्या तुलनेत ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी पूरक आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी 151 धावा होतात. नागपूर येथे 2019मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला गेला. हा सामना भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दीपक चाहर (Deepak Chahar) याने 3.2 षटकात 7 धावा देत 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. हा सामना भारताने 30 धावांनी जिंकला होता.
पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाने भारताला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. मोहाली येथे खेळला गेलेला पहिला टी20 सामना ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सने जिंकला होता. यामुळे ते तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0ने पुढे आहेत. तसेच दुसऱ्या सामन्यात भारताच्या संघात जसप्रीत बुमराह अंतिम अकरामध्ये येण्याची शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमने शतक करताच केली रोहितची बरोबरी, विराट कोहलीचा ‘तो’ विक्रमही मोडीत
बाबर-रिझवानने रचला इतिहास! टी20च्या इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिलीच सलामी जोडी
“आता त्याने तेच करावं”, भारतीय दिग्गजाचा रोहितला कानमंत्र