भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेचे यजमानपद भारताकडे असून पहिला कसोटी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर तर दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर 27 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहे. मालिकेच्या सुरुवातीपूर्वी सर्व तयारी पूर्ण झाली असून दोन्ही संघांनी विजयाचे इरादे देखील व्यक्त केले आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्याच्या दृष्टीनेही या मालिकेचे महत्त्व खूप जास्त आहे. कारण भारत आणि बांग्लादेश अजूनही अंतिम फेरीच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे दोन्ही संंघासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. वास्तविक भारत विरुद्ध बांग्लादेश मालिकेसाठी समालोचकाची यादी जाहीर झाली आहे. ज्यामध्ये अनेक दिग्गजांचा सामवेश आहे.
क्रिकेटचा सामना असो किंवा इतर कोणताही खेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात समालोचन खूप महत्त्वाची भूमिका बजावते. एक चांगला समालोचक आपल्या आवाजाने सामन्याच्या कोणत्याही क्षणाला संस्मरणीय बनवू शकतो. भारतीय क्रिकेट इतिहासातील याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे रवी शास्त्री. याशिवाय आकाश चोप्राही खूप एक्सपर्ट आहे. हे दोघेही कसोटी मालिकेदरम्यान कॉमेंट्री पॅनलचा भाग असतील. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेत एकूण 8 भाषांमधील वेगवेगळे समालोचक त्यांचे कौशल्य दाखवतील.
भारत विरुद्ध बांग्लादेश कसोटी मालिकेसाठी समालोचकांची संपूर्ण यादी
इंग्रजी समालोचक: सुनील गावस्कर, हर्षा भोगले, मेल जोन्स, रवी शास्त्री, शेन वॉटसन, अथर अली खान, पार्थिव पटेल, तमीम इक्बाल
हिंदी समालोचक: आकाश चोप्रा, सबा करीम, अजय जडेजा, सरनदीप सिंग, आरपी सिंग
तमिळ समालोचक: अभिनव मुकुंद, अनिरुद्ध श्रीकांत, अश्वथ बोबो, केबी अरुण कार्तिक, विद्युत शिवरामकृष्णन, आर श्रीधर
तेलुगू समालोचक: हनुमा विहारी, कल्याण कोलारप्पू, आशिष रेड्डी, अक्षत रेड्डी
कन्नड समालोचक: व्यंकटेश प्रसाद, के गौतम, राघवेंद्र राज, श्रीनिवास मूर्ती
भोजपुरी समालोचक: गुलाम हुसैन, सौरभ कुमार, शिवम सिंग, आशुतोष अमान
बंगाली समालोचक: शथिरा झाकीर जेसी, संजीब मुखर्जी, सारदिंदू मुखर्जी, सीआर वेंकटरामन
हरियाणी समालोचक: मनविंदर बिसला, आरजे किसना आणि सोनू शर्मा
हेही वाचा-
गोल्डन बॉय नीरज चोप्राची शस्त्रक्रिया यशस्वी; फ्रॅक्चर हाताने खेळली होती डायमंड लीग
सूर्यानंतर टी20 संघाचे कर्णधारपद कोणाला? दिग्गजाने उघड केले ‘नेक्स्ट सुपरस्टार’चे नाव
‘या’ 3 दिग्गजांच्या नावावर कसोटीमध्ये दोन्ही डावात शून्यावर बाद होण्याचा खराब रेकाॅर्ड