शनिवारी (७ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय ॲथलिट नीरज चोप्रा याने भालाफेक या क्रीडा प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. हे पदक मिळवल्यानंतर कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राबद्दल सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. सोशल मीडियावर देखील सर्वत्र नीरज चोप्राची चर्चा आहे. अशातच सोशल मीडियावर नीरज चोप्राच्या फॅन फॉलोविंगमध्ये देखील एका रात्रीत झपाट्याने वाढ झाली आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवताच एका रात्रीत त्याचे लाखो फॉलोवर्स वाढले आहेत. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी नीरज चोप्राच्या इंस्टाग्राम फॉलोवर्सची संख्या १ लाखांच्या आसपास होती. परंतु, घवघवीत यश मिळवल्यानंतर त्याच्या फॉलोवर्सची संख्या ३ मिलियसच्या (३० लाख) ही पुढे गेली आहे.
https://www.instagram.com/p/CN7RWMUl2-8/
हरियाणा स्थित खांद्रा गावातून येणाऱ्या एका शेतकऱ्याच्या या मुलाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ट्रॅक आणि फील्ड प्रकारात आतापर्यंतचे पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. त्याने भालफेक या क्रिडा प्रकारात आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात ८७.५८ मीटर भाला फेकून सर्वंनाच आश्चर्यचकित केले. गेल्या १०० वर्षांपासूनचे ॲथलेटीक्समधील हे भारताचे पहिलेच सुवर्ण पदक होते.(Neeraj chopra millions of followers increase after win gold in Tokyo Olympics)
https://www.instagram.com/p/CM6Ye_ElBnp/
सुवर्ण पदक मिळवताच कोट्यावधीची बक्षीसे जाहीर
भारताला ॲथलेटीक्समध्ये पाहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राला आतापर्यंत एकूण १० कोटींपेक्षाही अधिक रकमेची बक्षीसे जाहीर करण्यात आली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री लाल खट्टर यांनी ६ कोटी रुपये तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी २ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.
यासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयपीएल फ्रांचाइजी चेन्नई सुपर किंग्सने नीरजला प्रत्येकी १ कोटी रुपये बक्षीस म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच ऑनलाईन शिक्षण देणारी कंपनी बायजूजने देखील नीरज चोप्राला बक्षिस म्हणून दोन कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. यासोबतच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या इतर खेळाडूंना देखील बायजू रोख रक्कम म्हणून १ कोटी रुपये बक्षिस म्हणून देणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोच राहुल द्रविड बनले ‘कन्नड टिचर’, चक्क ब्रिटिश उच्चायुक्ताला दिले धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल
काळीज तोडणारा क्षण! बार्सिलोना क्लबचा निरोप घेताना मेस्सीला अश्रू अनावर, खूप रडला
टोकियो वारी संपवून घरी परतल्यानंतर मिळाले बहिणीच्या निधनाचे वृत्त, ढसाढसा रडली ‘ही’ भारतीय ऍथलिट