---Advertisement---

टोकियो वारी संपवून घरी परतल्यानंतर मिळाले बहिणीच्या निधनाचे वृत्त, ढसाढसा रडली ‘ही’ भारतीय ऍथलिट

On: सोमवार, ऑगस्ट 9, 2021 11:59 AM
---Advertisement---

२३ जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली होती. तर ८ ऑगस्ट रोजी याचा समारोप देखील झाला आहे. याच दरम्यान अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून पदक मिळवले आहे. मात्र काहींना अथक प्रयत्न करूनही पदक मिळवण्यात यश मिळाले नाही. या स्पर्धेनंतर सर्व खेळाडू घरी परतले आहेत. त्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्यानंतर सुभा वेंकटेशन आणि धनलक्ष्मी शेखर शनिवारी (०७ ऑगस्ट) घरी परतल्या आहेत. ती तामिळनाडूतील आपले गाव तिरुचीला पोहोचली आहे. जिथे या दोन्ही खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले.

याच दरम्यान धनलक्ष्मीला अशी दुःखद बातमी मिळाली की, तिला सर्वांसमोर रडू आले. खर तर जेव्हा धनलक्ष्मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सामने खेळत होती, तेव्हाच तिची बहीण तामिळनाडूमध्ये आजाराने मरण पावली. पण कुटुंबातील सदस्यांनी धनलक्ष्मीला याची माहिती दिली नाही.

टोकियो ऑलिम्पिक संपवल्यानंतर आपल्या मूळ गावी पोहोचताच धनलक्ष्मीचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिला तिच्या बहिणीच्या निधनाचे वृत्त मिळाले. याबद्दल धनलक्ष्मी म्हणाली की, “मला ऑलिम्पिकमध्ये खूप मेहनत घ्यावी लागली होती. पण पुढच्या वेळी मी याही पेक्षा अधिक मेहनत करेल आणि पदक जिंकेल व देशाची मान उंचावेल.”

ती पुढे म्हणाली की, “आता तामिळनाडूला पूर्वीपेक्षा खेळांमध्ये चांगले प्रतिनिधित्व मिळू लागले आहे. पूर्वीच्या ऑलिम्पिकमध्ये तामिळनाडूचे खेळाडू सहभागी झाले नव्हते, पण आता ते चित्र बदलले आहे. मला खात्री आहे की भविष्यात त्याची संख्या आणखी वाढेल.”

अचानक रडली धनलक्ष्मी 
धनलक्ष्मी बोलत असताना अचानक रडू लागली, त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले. खरं तर, धनलक्ष्मीला हे समजले होते की, ती टोकियोमध्ये असताना तिच्या बहिणीचा आजाराने मृत्यू झाला आहे. पण तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला हे सांगणे योग्य मानले नाही. कारण तिने आपले लक्ष खेळावर ठेवावे अशी कुटुंबीयांची इच्छा होती.

जेव्हा धनलक्ष्मीला तिच्या बहिणीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले तेव्हा ती आपले अश्रू थांबवू शकली नाही. ती गुडघ्यावर खाली बसली आणि खूप रडायला लागली. कसे तरी तिला तिच्या नातेवाईकांनी समजवण्याचा प्रयत्न केला आणि तिला घरी घेऊन गेले.

महत्त्वाच्या बातम्या-

टोकियो ऑलिंपिक्स मेडल: भारत एका ‘गोल्ड’सह ४८ व्या स्थानी, तर चीनला पछाडत अमेरिकेने पटकावला अव्वल क्रमांक

अभिमानास्पद! अभिनव बिंद्रानंतर ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसराच भारतीय

ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ पराभूत झाल्याने ‘या’ खेळाडूच्या कुटुंबावर जातीवाचक टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---