पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे. अर्शद नदीमने 40 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानला सुवर्ण पदक मिळवून दिला आहे. पाकिस्तानने शेवटच्या वेळी 1984 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकले होते. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये अर्शदने बाजी मारत 92.97 मीटर भाला थ्रो करुन सुवर्ण पदक आपल्या नावे केला. तर भारताच्या गोल्डन बाॅय नीरज चाैप्राला राैप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. पाकिस्तानने यापूर्वी 1992 च्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. बार्सिलोना ऑलिम्पिक 1992 मध्ये पाकिस्तानने हॉकीमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
मीडियाशी बोलताना नीरज चोप्राची आई म्हणाली की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकल्यामुळे ती आपल्या मुलाच्या कामगिरीवर खूप आनंदी आहे. नीरज चोप्राची आई सरोज देवी यांनी एएनआयला सांगितले की ती आपल्या मुलाच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीवर खूश आहे आणि तो परत आल्यावर तिच्यासाठी तिचे आवडते पदार्थ बनवण्यासठी ती उत्सुक आहे. नीरज चोप्राच्या आईनेही अर्शद नदीमचे कौतुक केले आणि तोही तिच्या मुलासारखा असल्याचे सांगितले.
Neeraj Chopra’s mother says “ I am happy with the silver, the guy who got gold ( Arshad Nadeem) is also my child, everyone goes there after doing a lot of hard work”
what grace from Neeraj Chopra’s mother, something that people can learn a lot from ♥️
Most beautiful video on… pic.twitter.com/Uqz3LQZCv7
— Roshan Rai (@RoshanKrRaii) August 8, 2024
पुढे बोलताना नीरज चोप्राची आई म्हणाली, ‘तो जखमी झाला होता, त्यामुळे आम्ही त्याच्या कामगिरीवर खूश आहोत. मी त्याचे आवडते पदार्थ बनवीन. नीरज चोप्राचे वडील सतीश कुमार म्हणाले की, पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज पाकिस्तानचा दिवस होता. नीरज चोप्राचे वडील सतीश कुमार म्हणाले, ‘प्रत्येकाचा दिवस असतो. आज पाकिस्तानचा दिवस होता, पण आम्ही रौप्य पदक जिंकले आहे आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सतीश कुमार म्हणाला, ‘मला वाटते की पाठीच्या दुखापतीने नीरजच्या कामगिरीत भूमिका बजावली आहे.’
#WATCH | Haryana: On Neeraj Chopra winning a silver medal in men’s javelin throw at #ParisOlympics2024, his father Satish Kumar says, “Everyone has their day, today was Pakistan’s day…But we have won silver, and it is a proud thing for us…” pic.twitter.com/YQNpdTDYzg
— ANI (@ANI) August 8, 2024
तत्तपूर्वी भालाभेक स्पर्धेत नीरज चाैप्राने सलग दुसरे पदक जिंकून इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला. त्याने टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण तर यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये राैप्य पदक जिंकले आहे. या हंगामात त्याने सर्वाधिक खेळ केला आहे. त्याने 89.45 मीटर भाला थ्रो केला.
हेही वाचा-
क्रिकेटर बनण्याचं स्वप्न होतं, भालाफेकीत मोडला ऑलिम्पिक रेकॉर्ड! कोण आहे पाकिस्तानचा नवा सुपरस्टार अर्शद नदीम?
भारताच्या पाच पदकांवर पाकिस्तानचा एक ‘सुवर्ण’ भारी, पदकतालिकेत भारताला मोठा धक्का
“खरचं खूप दु:ख…”, विनेश फोगटच्या अपात्रतेवर नीरज चोप्राची भावनिक प्रतिक्रिया