---Advertisement---

‘आपले सर्वोत्तम देण्याची हीच ती वेळ’, टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्यास नीरज चोप्रा सज्ज, फोटो व्हायरल

---Advertisement---

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताच्या पदरात अद्याप एकमेव पदक पडले आहे. शनिवारी (२४ जुलै) महिला वेट लिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात वेट लिफ्टर मिराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई केली होती. मात्र, यानंतर भारताला इतर खेळांमध्ये एकही पदक मिळू शकलेले नाही. असे असले, तरीही भारताला भालाफेक या खेळात एका खेळाडू खेळाडूकडून पदकाची अपेक्षा आहेत. तो खेळाडू इतर कोणी नसून भालाफेकपटू नीरज चोप्रा आहे. त्याने नुकताच आपला एक फोटो शेअर केला आहे, ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.

नीरजने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो विमानतळावर बसल्याचे दिसत आहे. त्याच्यासोबतच या फोटोत इतर दोन व्यक्तीही आहेत. (Neeraj Chopra Ready To Go Tokyo Olympics 2020)

https://twitter.com/Neeraj_chopra1/status/1419603397850935297

हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “खूप उत्साहाने माझ्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला निघालो. आपले सर्वोत्तम देण्याची हीच ती वेळ आहे. भारतीयांनो पाठिंबा देत राहा.”

टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या नीरजने २०२० साली कोर्टन खेळात फिनलँडमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो हा ८६.७९ मीटर आहे. ही कामगिरी त्याने दुसऱ्या प्रयत्नात केली होती.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?

-टेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन

-तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---